इंदिरानगर व्यावसायिक खूनप्रकरण; भुसावळमधून एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:03 AM2019-01-18T01:03:39+5:302019-01-18T01:04:37+5:30

इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Indiranagar commercial murder; A possession from Bhusawal | इंदिरानगर व्यावसायिक खूनप्रकरण; भुसावळमधून एक ताब्यात

इंदिरानगर व्यावसायिक खूनप्रकरण; भुसावळमधून एक ताब्यात

Next

पंचवटी : इंदिरानगर येथील व्यावसायिक हत्याप्रकरणी आणखी एका संशयिताच्या थेट भुसावळमधून गुरुवारी (दि.१७) मुसक्या आवळल्या. दरम्यान, या गुन्ह्यातील दोघा संशयितांना न्यायालयाने २५ तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे.
इंदिरानगरला गेल्या मंगळवारी (दि.८) रात्रीच्या सुमारास व्यावसायिक अविनाश शिंदे यांची निर्घृण हत्या करून सुमारे सहा लाखांची जबरी लूट करण्यात आली होती. याप्रकरणी आठवडाभरानंतर गुन्हे शाखा व पंचवटी पोलिसांना संशयितांना जाळ्यात ओढण्यास यश आले आहे. गुन्हे शाखेने बुधवारी चिमा नाना पवार, सुनील रामचंद्र पवार या दोघांना बेड्या ठोकल्या.
दोघे फुलेनगर पेठरोड येथील रहिवासी असल्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तपासचक्रे फिरविली.
गुन्ह्यातील मुख्य संशयितांपैकी एक विलास राजू मिरजकर (२६, रा.तेलंगवाडी, पेठरोड) याच्या मुसक्या आवळल्या.
विलास हा गुन्हा घडल्यापासून कुटुंबीयांसह फरार झाला होता. मात्र विलास हा सातत्याने शहरे बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहचणे कठीण होत होते. सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, सुरेश नरवडे, महेश साळुंके, संदीप काकड, विलास चारोस्कर यांनी भुसावळ गाठले. येथे नातेवाइकांच्या घरात तो दडून बसला होता. पथकाने त्यास सापळा लावून ताब्यात घेतले.

Web Title: Indiranagar commercial murder; A possession from Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.