कांद्याच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:22 PM2018-06-25T23:22:29+5:302018-06-25T23:22:53+5:30

येवला : राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. कांदा हजारावर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Increase in onion demand | कांद्याच्या मागणीत वाढ

कांद्याच्या मागणीत वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देयेवला : उत्पादकांच्या आशा पल्लवित

येवला : राजस्थान व मध्य प्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड असल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. कांदा हजारावर गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कांदा भावात दररोज सुधारणा होत आहे. शेतकरी चाळीत साठवून ठेवलेला कांदा पाहून आनंदी होत असून, उन्हाळ कांदा तारणार असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याला भाव मिळाला होता, त्याची पुनरावृत्ती होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या सप्ताहात शुक्रवारी कांद्यास सरासरी १०५१ रुपये भाव मिळाला. सोमवारी तुलनेत १०० रुपयांनी वाढ होऊन, सरासरी ११५० रुपये प्रतिक्विंटल, तर कमाल १२५२ रुपयांपर्यंत पोहचल्याने बळीराजाची कळी फुलणार असल्याचा आशावाद निर्माण झाला आहे. यापुढे काही दिवस तरी कांदा भाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे जाणकार सांगत आहेत. गेल्या दहा ते बारा
दिवसांपासून कांदा भावात अल्पशी वाढ झाली आहे. गेल्या सप्ताहात येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत व बाजारभावात वाढ झाल्याचे दिसले. कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल आदी राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो व सिंगापूर आदी ठिकाणी मागणी चांगली होती. दररोज ५० ते १०० रुपयांची वाढ होत असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title: Increase in onion demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.