कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:12 AM2018-03-24T00:12:31+5:302018-03-24T00:12:31+5:30

काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे.

 Since the inadequate price is available, the anchor from the vegetables | कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

कवडीमोल भाव मिळत असल्याने भाजीपाल्यावर नांगर

Next

सायखेडा : काबाडकष्ट करून शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील भाजीपाल्यावर नांगर घालून आपला संताप व्यक्त केला आहे. सरकारच्या अनास्थेमुळे भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक हे नगदी पीक म्हणून शेतकरी आपल्या शेतात करतात, कमी कालावधीत चार पैसे हातात पडतील या आशेने ऐन उन्हाळ्यात भाजीपाला चांगल्या भावात विकला जाईल या आशेवर असलेल्या शेतक ºयाची गडगडणाºया भावामुळे मोठे नुकसान होत आहे. गोदाकाठ भागात अनेक शेतकºयांनी शेतात भाजीपाला पिकवला असून, आज भाव मिळत नसल्याने शेतात सोडून द्यावा लागत आहे. एका हंगामात दर नाही मिळाला तर दुसºया हंगामात तो भरून निघेल या आशेने शेतात केलेला भाजीपाला काढणीसाठी परवड नसल्याने नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला म्हणून गोदाकाठची ओळख झाली आहे. काळी कसदार जमीन, मुबलक पाणी यामुळे उन्हाळ्यातदेखील शेतात पीक चांगले येते, शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे अनेक शेतकरी पीक करत नाही. भाजीपाल्याचा तुटवडा येऊन बाजारभाव चांगला मिळेल या आशेवर शेतकरी रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड करत असतात. भाव कमी मिळत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात पिकविलेला भाजीपाला मार्केट अथवा आठवडे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे बंद केले आहे. भाजीपाला काढणे आणि बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे हा खर्च वसूल होत नसल्याने शेतीतून भाजीपाला काढणे शेतकºयांनी बंद केले आहेशेतीची मशागत, रोपे, खते, बी-बियाणे, कीटकनाशक औषधे, मजुरी, असे लाखो रुपये भांडवल वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमालाला निर्धारित मूल्य असल्यास शेती तोट्यात जाणार नाही शेतमालातून किमान शेतकºयाला प्रपंच चालविण्यासाठी चार पैसे मिळाले पाहिजे, झालेला खर्च किमान वसूल झाला पाहिजे, असे हमीभाव असले पाहिजे तरच शेतकरी वाचेल अन्यथा वाढते कर्ज, व्याज, मुलांचे शिक्षण, लग्न या सर्व गरजा शेतकरी कशा पद्धतीने पूर्ण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हमीभावाकडे दुर्लक्ष
शेतमाल परवडत नाही त्यामुळे हमीभाव मिळाला पाहिजे, अशी केवळ चर्चाच ऐकायला मिळते; पण प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयत्न करण्यासाठी कोणीही फारसा इच्छुक दिसत नाही. लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. कोणीच या संदर्भात सरकारला धारेवर धरत नाही. केवळ शेतकरी संघटनेच्या अजेंट्याचा विषय असल्याने हमीभावाकडे दुर्लक्ष केले जात आहे. याप्रश्नी लोकप्रतिनिधींची उदासीनता पहायला मिळते.
प्रचंड मेहनत करून भाजीपाला पिकवला, कर्ज काढून, उसनवारी करून भांडवल खर्च केले. आज फ्लॉवर आणि कोबीला बाजारात विक्रीसाठी घेऊन गेले तर कोणी विचारत नाही अशी परिस्थिती आहे, अशा काळात आम्ही शेतकºयांनी प्रपंच कसा चालवायचा, कुटुंब चालविण्यासाठी खर्च येतो तो कसा भागवायचा, शेतकरी आर्थिक परिस्थिती खचला जात आहे आता सरकारने आम्ही कसे जगावे याचा सल्ला घ्यावा ही विनंती आहे.
- शांताराम हांडगे, शेतकरी, चाटोरी

Web Title:  Since the inadequate price is available, the anchor from the vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.