टमाटा बाजारभावात सुधारणा; आवक कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:38 AM2018-06-30T00:38:52+5:302018-06-30T00:39:27+5:30

तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते.

 Improvement in Tomato market; Inward Decrease | टमाटा बाजारभावात सुधारणा; आवक कमी

टमाटा बाजारभावात सुधारणा; आवक कमी

googlenewsNext

पंचवटी : तीन महिन्यांपूर्वी टमाटा मालाची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव पूर्णपणे गडगडले होते. टमाटा मालाला दोन रुपये प्रति किलो असा दर मिळत असल्याने लागवडीसाठी लागणारा खर्च तसेच दळणवळणाचा खर्चही सुटत नसल्याने अनेक टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टमाटा जनावरांसाठी सोडून दिला होता, तर काहींनी टमाटा पीक काढून टाकले होते. सध्या नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाची आवक कमी प्रमाणात असून, मागणी असल्याने सध्या तरी टमाटा मालाचे बाजारभाव टिकून आहेत. नाशिक बाजार समितीत विक्रीसाठी येणाºया टमाटा मालाला दर्जानुसार प्रति किलो २० रुपये असा बाजारभाव मिळत आहे.  गेल्या मार्च महिन्यात टमाटा मालाची आवक वाढली होती त्यातच ज्या त्या बाजारपेठेत स्थानिक टमाटा माल दाखल होत असल्याने टमाटा २ रुपये प्रति किलो दराने विक्री होत होता. याशिवाय नाशिकच्या बाजार समितीतून पाकिस्तान, बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात टमाटा मालाची निर्यातही केली जायची मात्र भारत-पाक सीमेवर सुरू असलेल्या वादामुळे बॉर्डर बंद असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून बॉर्डर बंद होती त्यामुळे परदेशातील निर्यात पूर्णपणे थांबली होती.  गेल्या पंधरवड्यापासून टमाटा मालाची आवक कमी होत चालल्याने बाजारभावात बºयापैकी सुधारणा झाली आहे. टमाटा मालाला (२०) किलो जाळीसाठी ४०० ते ४५० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. टमाटा मालाला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकºयांनी टमाटा पिकाकडे दुर्लक्ष केल्याने पीक नाश पावले होते, तर ज्यांनी टमाटा पिकाचे उत्पादन सुरू ठेवले होते त्यांना आजमितीस चांगला बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत आवक कमी झाल्याने तसेच मागणी असल्याने टमाटा मुंबई, गुजरात यांसह अन्य भागांत रवाना केला जात आहे. नाशिक बाजार समितीत टमाटा २० रुपये किलो, तर पुणे नारायणगाव या भागांत टमाटा मालाची आवक जास्त असल्याने टमाट्याला १३ ते १५ रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत आहे.
टमाट्याला बॉर्डर बंदच
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाकिस्तान तसेच बांग्लादेशात टमाटा मालाची आवक केली जाते. मात्र भारत- पाक सीमेवर अधूनमधून सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे गेल्या वर्षी १५ आॅगस्टपासून बॉर्डर बंदच असल्याने नाशिकमधून जाणाºया टमाटा मालाची निर्यात पूर्णपणे थांबलेली आहे. आगामी कालावधीत बॉर्डर सुरू झाली तर टमाट्याचे बाजारभाव आणखी तेजित येण्याची शक्यता आहे.

Web Title:  Improvement in Tomato market; Inward Decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.