वेतन करार लागू करण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 06:38 PM2019-06-26T18:38:10+5:302019-06-26T18:41:38+5:30

ओझरटाऊनशिप : एच ए एल कामगारांचा वेतन करार डिसेंबर २०१६ ला संपला असून १ जानेवारी २०१७ पासूनचा वेतन करार लागू करावा या मागणीचे निवेदन कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली एचएएल कामगारांच्या शिष्टमंडळाने बंगलौर येथे एच ए एल कामगार संघटनांच्या समन्वय समितीचे मुख्य समन्वयक सूर्यदेवरा चंद्रशेखर यांना दिले.

To implement the wage contract | वेतन करार लागू करण्यासाठी साकडे

वेतन करार लागू करण्यासाठी साकडे

Next

कामगारामध्ये जागरुकता निर्माण करु न माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी कामगारामध्ये सह्यांची मोहिम राबविली. ३२०० पैकी २३५० कामगारांनी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. २१ जून २०१९ रोजी संघटनेचे सरचिटणीस व अध्यक्ष यांना सह्यांचे निवदन दिले. त्यानंतर बंगलौर येथे या निवेदनाची प्रत एच ए एल कामगारांच्या शिष्टमंडळाने समन्वय समितीचे मुख्य समन्वयक सुर्यदेवरा चंद्रशेखर यांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले. यावेळी संजय कुटे यांच्यासह आनंद गांगुर्डे, प्रकाश गभाले, प्रशांत आहेर,अविनाश कुलकर्णी, अनिल गवळी,रोशन कदम,श्रीकांत घुले, भावेश विसपुते राहूल कोळपकर,संतोष आहिरे ,प्रशांत जाधव, कमलेश मैंद,जयंता भंबारे आदी उपस्थित होते.

Web Title: To implement the wage contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.