खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:47 AM2018-06-19T01:47:42+5:302018-06-19T01:47:42+5:30

पीककर्ज वाटपासंदर्भात राष्टयीकृत बॅँकांची बैठक बोलावून कर्जमाफीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्या. दरम्यान, शेतकºयांनी पीक कर्जासाठी त्वरित राष्टÑीयीकृत बॅँकांकडे सातबारासह अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Immediate lending for kharif crops | खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या

खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज द्या

Next

नाशिक : पीककर्ज वाटपासंदर्भात राष्टयीकृत बॅँकांची बैठक बोलावून कर्जमाफीचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिल्या. दरम्यान, शेतकºयांनी पीक कर्जासाठी त्वरित राष्टÑीयीकृत बॅँकांकडे सातबारासह अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खरिपाच्या पेरणीसाठी शेतकºयांना कर्ज उपलब्ध व्हावे, यासंदर्भात राधाकृष्णन यांनी सोमवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बॅँकांच्या अधिकाºयांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी पीक कर्जासाठी आलेल्या शेतक-यांच्या अर्जावर गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घेत आठवडाभरात कर्जाची रक्कम मंजूर करण्याच्या सूचना केल्या. याबाबत जनजागृती म्हणून गावपातळीवर मेळावे घेण्याचा आदेश त्यांनी यावेळी दिला. जिल्हा बॅँकेने ८३ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यंदाचा वार्षिक आराखडा २ हजार ६२५ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. शेतकºयांच्या सातबारांवर २४ तासांत बोझा चढवून दाखल प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना राधाकृष्णन बी यांनी बॅँकांच्या अधिकाºयांना दिल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांनी २४० कोटी रुपयांचे क र्ज दिले आहे.सरकारच्या कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकºयांनी आपल्या सातबारासह आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडून पीककर्ज अर्ज राष्टÑीयीकृत बॅँकांकडे करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अद्याप एकूण ३२३ कोटी रुपयांचे कर्ज विविध बॅँकांकडून जिल्ह्यातील शेतकºयांना वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Immediate lending for kharif crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.