आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:16 AM2018-04-22T00:16:52+5:302018-04-22T00:16:52+5:30

आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आदिवासी बांधवांनी वनजमिनीबाबत दावे दाखल करावे, याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क बैठकीत पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य नितीन पवार यांनी दिली.

 Ignore the basic questions of the tribals | आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक

आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे डोळेझाक

Next

कळवण : आदिवासींना वनजमिनी देण्याचा निर्णय होऊनदेखील अनेक आदिवासी बांधवांना पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनी मिळालेल्या नाही, तर ज्या बांधवांना मिळाल्या त्यात जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले असून, कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय झाला आहे. आदिवासी बांधवांनी वनजमिनीबाबत दावे दाखल करावे, याबाबत जिल्हास्तरीय वनहक्क बैठकीत पाठपुरावा करू, अशी ग्वाही जिल्हा वनहक्क समितीचे सदस्य नितीन पवार यांनी दिली.  जयदर परिसरातील पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य, वीज, वनहक्क जमीन आदी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाने व संबंधित यंत्रणेने पावले उचलावीत, असे आवाहनही पवार यांनी जयदर येथील आढावा बैठकीत केले. जयदर व परिसरातील गावांमधील विविध विभागांच्या विकासकामांचा आढावा घेण्याबाबत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी, पोलीसपाटील व ग्रामस्थांच्या वतीने संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. वनहक्क जमिनींबरोबर परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, विजेच्या समस्या, शिधापत्रिका, आरोग्य, पाणीपुरवठा योजनांच्या अपूर्ण कामांबाबत आदिवासींच्या वतीने तक्रारी मांडण्यात आल्या. तालुक्यात ठप्प झालेल्या विकासकामांबाबत आदिवासी बांधवांनी नाराजीचा सूर काढला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार होत्या. पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सदस्य लाला जाधव, केदा ठाकरे, ज्येष्ठ नेते अर्जुन बागुल, संतोष देशमुख, बाबूराव पवार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम यांच्यासह विविध खात्यांंचे प्रमुख उपस्थित होते. कनाशी व जयदर परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, रस्त्यांची दुरुस्ती करावी, जयदर परिसरातील वनहक्क कायद्यानुसार वनजमिनींचे प्रस्ताव मंजूर करावे. प्रमाणपत्र मिळवून जमीन नाही, जमिनीचे क्षेत्र कमी मिळाले, वनजमिनीचे प्रस्ताव फेटाळून लावले आदी तक्रारी आदिवासी बांधवांकडून यावेळी मांडण्यात आल्या. जांभाळ, भौती, हनुमंतमाळ पाडा, शिरसा, पायरपाडा, महाल, वाड्याआंबा पाडा, गायदरपाडा, धुमंदर, कोसवन, बंधारपाडा, नाळीद, पुणेगाव, खडकीपाडा, जयदर, मोहबारी, पिंपळे, भांडणे, पाडगण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, पाणीपुरवठा योजनांतर्गत अपूर्णावस्थेत असलेली कामे, विहिरींची कामे आदी कामासंदर्भात चर्चा करण्यात येऊन अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी करून पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला. यावेळी पंचायत समतिीचे माजी सदस्य अर्जून बागूल, पंचायत समतिीचे सदस्य लाला जाधव, केदा ठाकरे, केदा बहिरम, संतोष गावित, उत्तम भोये, नंदू गावित, रामदास चव्हाण, राजाराम चौधरी, मन्साराम गायकवाड, दत्तू गांगुर्डे, पोपट पवार, लक्ष्मण पवार, गुड्डू वराडे आदीसह सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे सभापती, सदस्य यांनी विविध प्रश्न उपस्थित केले.

Web Title:  Ignore the basic questions of the tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक