‘मी द्रौपदी बोलतेय’चा एकपात्री प्रयोग रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:32 AM2019-04-23T00:32:18+5:302019-04-23T00:32:35+5:30

येथील मोदकेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या चैत्र व्याख्यानमालेचे चौथे पुष्प अ‍ॅड. देशपांडे यांनी रचले. मी द्रौपदी बोलतेय या एकपात्री प्रयोगातून त्यांनी द्रौपदीचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला.

 I used to sing a single experiment of 'Draupadi speaking' | ‘मी द्रौपदी बोलतेय’चा एकपात्री प्रयोग रंगला

‘मी द्रौपदी बोलतेय’चा एकपात्री प्रयोग रंगला

Next

इंदिरानगर : येथील मोदकेश्वर मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या चैत्र व्याख्यानमालेचे चौथे पुष्प अ‍ॅड. देशपांडे यांनी रचले. मी द्रौपदी बोलतेय या एकपात्री प्रयोगातून त्यांनी द्रौपदीचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. यावेळी द्रौपदीच्या जीवनात घडलेल्या प्रत्येक गोष्टी किंवा तिच्या आयुष्यात आलेल्या सगळ्यांचेच हुबेहूब रेखाचित्र त्यांनी वर्णन केले.
द्रौपदीने पती पुत्र किंवा तिचा सखा असलेला कृष्णा या सर्वांशी कसा समतोल राखला, हे यावेळी दाखविण्यात आला. त्याचबरोबर द्रौपदीने अखेरीस माझे पती हे खेळात हरले असताना त्यांनी मला पणाला का लावले? हा प्रश्न उपस्थित करताच सर्वच रसिक भारावून गेले होते. या आगळ्यावेगळ्या एकपात्री प्रयोगामुळे उपस्थित रसिकांना चांगलीच माहिती मिळाल्याचे दिसून आले. कार्यक्र माच्या सुरु वातीला चैत्रा मला हुदलीकर यांनी हिंदी कविता सादर केली, तर व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन संतोष हुदलीकर यांनी केले. चौथे पुष्प अ‍ॅड. देशपांडे यांनी रचले. ‘मी द्रौपदी बोलतेय’ या एकपात्री प्रयोगातून त्यांनी द्रौपदीचा संपूर्ण जीवनपट उपस्थितांसमोर मांडला.
मान्यवरांचा सत्कार
एकपात्री प्रयोगाचे संगीतकार म्हणून वरु ण भोईर यांनी काम पाहिले. या एकपात्री प्रयोगाचे आजपर्यंत अनेक प्रयोग करण्यात आले असून एक महिला महिलांसह पुरु षांचा सुद्धा हुबेहूब आवाज काढत असल्याने रसिकांनी या प्रयोगाला चांगलीच दाद दिली. या कार्यक्र मात आंतराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शैलजा जैन यांना चैत्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़

Web Title:  I used to sing a single experiment of 'Draupadi speaking'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.