शहर-ग्रामीण पोलिसांचे हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:53 AM2018-07-10T00:53:55+5:302018-07-10T00:54:12+5:30

नाशिक शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजरोड, गंगापूररोड यांसह ग्रामीणमधील नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विविध हॉटेल्समध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू झाले आहेत़

Hukka parlors of city-rural police ignored | शहर-ग्रामीण पोलिसांचे हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष

शहर-ग्रामीण पोलिसांचे हुक्का पार्लरकडे दुर्लक्ष

Next

नाशिक : नाशिक शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजरोड, गंगापूररोड यांसह ग्रामीणमधील नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीतील विविध हॉटेल्समध्ये सर्रास हुक्का पार्लर सुरू झाले आहेत़ विशेष म्हणजे शहर पोलिसांनी कॉलेजरोड तर ग्रामीण पोलिसांनी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील हुक्का पार्लर चालविणाºया हॉटेलांवर कारवाई केल्याचा दिखावा केला़ मात्र, त्यानंतर ही कारवाई थंडावली असून, पार्लर चालू ठेवण्यासाठी अर्थपूर्ण गणितात मोठी वाढ केल्याची चर्चा आहे़  गत काही वर्षांपासून शहरात हुक्का पार्लरचे पेव फुटले असून, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच तरुण त्यातही विशेषत: तरुणी व्यसनाकडे वळल्या आहेत. शहर पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी हुक्का पार्लरवर जोरदार कारवाई केली, मात्र त्यानंतर ती बंद पडल्याने हे हुक्का पार्लर पुन्हा सुरू झाले असून, याबाबत पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़ तर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील चांदशी, गंगापूर, गिरणारे आदी परिसरातील हॉटेल्समध्ये केवळ हुक्काच नव्हे तर अमली पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे़
शहरात पोलीस आयुक्त तर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक कायदा व सुव्यवस्था तसेच अवैध व्यवसायांना लगाम बसावा यासाठी प्रयत्नशील आहेत़ तर दुसरीकडे हुक्का पार्लर सुरू असलेल्या हद्दीतील पोलीस अधिकारी विशेषत: वसुली अधिकारी या अवैध व्यवसायांना खतपाणी घालून परवानगी देत असल्याची चर्चा खुद्द पोलीस कर्मचाºयांमध्ये आहे़ पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील व त्यांच्या पथकाने काही महिन्यांपूर्वीच म्हसरूळ तसेच शहरातील विविध परिसरातील हॉलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली होती़ या कारवाईमुळे तरुणांना व्यसनास लावणाºया या हुक्का पार्लरवर लगाम बसेल अशी अपेक्षा होती़
ग्रामीण भागातही सुरू
हुक्का पार्लरमध्ये महाविद्यालयीन युवतींचा मोठा सहभाग असल्याचे तसेच याठिकाणी मद्यपानही केले जात असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आले होते. नाशिक शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड, अंबड यांसह पोलीस आयुक्तालयातील मोजक्या हॉटेलात तर ग्रामीणमध्ये चांदशी, गिरणारे, कश्यपी डॅम आदी ठिकाणी हे हुक्का पार्लर सुरू असल्याचे चित्र आहे़

Web Title: Hukka parlors of city-rural police ignored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.