हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:33 AM2017-08-18T00:33:26+5:302017-08-18T00:33:40+5:30

Hotel kidnapping abductor? | हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण ?

हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण ?

Next

नाशिक : येथील अशोकामार्गावर राहणाºया एका हॉटेल व्यावसायिकाचा संगमनेर येथून नाशिककडे येताना शिंदे गावाजवळून अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजते.
संगमनेर येथे एका नामांकित हॉटेलचे संचालक घरी परतत असताना रस्त्यावरून दमदाटी करुन रात्रीच्या सुमारास त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत अपहरण केल्याची माहिती त्यांच्या पत्नीने मुंबई नाका पोलिसांना कळविली; मात्र रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कुठलीही नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती. सदर व्यावसायिकांनी साडेनऊ वाजेच्या सुमारास पत्नीच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संशयित अपहरणकर्त्याचे नाव सांगत त्याच्याकडून मारहाण केली जात असल्याची माहिती दिल्याचे समजते. सदर माहिती पत्नीने पोलिसांना दिली असून संशय असलेल्या व्यवसायातील काही लोकांची नावेदेखील सांगितल्याची माहिती समजते.

Web Title: Hotel kidnapping abductor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.