लासलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 07:39 PM2019-06-19T19:39:22+5:302019-06-19T19:39:38+5:30

लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांची नवी दिल्ली नाफेडच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच मुख्याध्यापक अनिता आहिरे व उपशिक्षक देविदास पगार यांच्या सेवापूर्तिनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Honorable students honored at Lasalgaon | लासलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लासलगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

googlenewsNext
ठळक मुद्दे गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात

लासलगाव : लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांची नवी दिल्ली नाफेडच्या संचालकपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच मुख्याध्यापक अनिता आहिरे व उपशिक्षक देविदास पगार यांच्या सेवापूर्तिनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
अर्चना पानगव्हाणे यांनी प्रास्तविक केले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिता आहिरे, सेवानिवत्त शिक्षक देविदास पगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांपैकी आशुतोष जाधव व भाग्यश्री मुंदडा यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पंचायत समिती सदस्य रंजना पाटील, संचालक निता पाटील, पुष्पा दरेकर, सिताराम जगताप, शंतनू पाटील, कैलास ठोंबरे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील, उध्दव आहिरे, अनिता पगार, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, पर्यवेक्षक रोशनी गायकवाड, मुख्याध्यापक सुधा आहेर, पर्यवेक्षक संजिवनी पाटील, मुख्याध्यापक अनिस काझी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचलन आरती गायकर यांनी केले तर आभार कौतिक आवारे यांनी मानले.
(फोटो १९ लालगाव)

Web Title: Honorable students honored at Lasalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा