Holi Chhatra Bharti Movement: School Ghatak privatization ghat | शाळा बंद आदेशाची केली होळीछात्रभारती आंदोलन : शाळांच्या खासगीकरणाचा घाट

ठळक मुद्देशाळा बंद आदेशाची केली होळीछात्रभारती आंदोलन : शाळांच्या खासगीकरणाचा घाट


शासननिर्णयाची होळी करून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना छात्रभारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

 

नाशिक : शिक्षणात महाराष्ट्र प्रगत झाल्याचा दावा करणाºया राज्य सरकारने कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे राज्यातील तब्बल १३१४ शाळा बंद करण्यात येणार आहे. शिक्षणाचे संपूर्ण खासगीकरण करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप करीत नाशिक जिल्हा छात्रभारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी (दि.४) सीबीएस जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अध्यादेशाची होळी करून निषेध नोंदवला आहे.
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना नजीकच्या अन्य सरकारी वा खासगी शाळेत सामावून घेण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले असून, राज्य सरकारचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचा थेट भंग करणारा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा तसेच परीक्षांसदर्भात घेतलेला निर्णयाचाही पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे. या आंदोलनात छात्रभारतीचे समाधान बागुल, राम सूर्यवंशी, राकेश पवार, जिल्हाध्यक्ष सागर निकम, विशाल रनमाळे, आम्रपाली वाकळे, देवीदास, कोमल गांगुर्डे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.