एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्या लोकांनी लुटला गणेश उत्सवाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 05:36 PM2018-09-19T17:36:37+5:302018-09-19T17:37:10+5:30

HIV People who live in symbiotic lanes enjoy the Ganesh festival | एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्या लोकांनी लुटला गणेश उत्सवाचा आनंद

एच.आय.व्ही. सहजीवन जगणार्या लोकांनी लुटला गणेश उत्सवाचा आनंद

googlenewsNext

नाशिक- महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि. व यश फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या गटाने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ५ दिवसांच्या गणेशजींची स्थापना करून एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया सदस्यांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी पुनर्वसन केंद्रा कडुन मंगल कामना केली. एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºयांना एकत्र आणणे व त्यांच्या सोबत आनंदाचे क्षण मोठ्या उत्साहाने साजरा करणे हा एकमेव उद्देश या गणेश उत्सवाच्या माध्यमातून साध्य करण्यात आला. या सण समारंभामध्ये सहभागी होणाºयांचे प्रमाण वाढत आहे. गणेश उत्सवात नाशिक जिल्ह्यातील १२० एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया व्यक्तींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि. चे कमलाकर घोंगडे, सुचित्रा कुलकर्णी तसेच यश फाऊंडेशन अध्यक्ष रविंद्र पाटील आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्रींचे विसर्जन मोठ्या जलोषात करण्यात आले. वाजत-गाजत मिरवणुकीचा आनंद लुटत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

 

Web Title: HIV People who live in symbiotic lanes enjoy the Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.