‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:31 AM2018-11-17T01:31:34+5:302018-11-17T01:31:55+5:30

पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील २६ ठिकाणी स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़ यामध्ये २० हजार दुचाकी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया दोन हजारांहून अधिक वाहनधारकांकडून दहा लाखांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़

'Helmet Drive' earns 10 lakhs | ‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई

‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई

Next
ठळक मुद्देपोलिसांची कारवाई : शहरातील २६ ठिकाणी मोहीम

नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील २६ ठिकाणी स्पेशल ड्राइव्ह राबविण्यात आला़ यामध्ये २० हजार दुचाकी वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाºया दोन हजारांहून अधिक वाहनधारकांकडून दहा लाखांहून अधिक रकमेची दंडवसुली करण्यात आली़
न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे़ हेल्मेटमुळे अपघातातील अनेकांचे प्राण वाचले असतानाही अनेकांकडून हेल्मेटबाबत टाळाटाळ केली जाते़ पोलीस आयुक्तांनी प्रथम जनजागृती केली व त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू केली़ शुक्रवारी राबविण्यात आलेल्या या कारवाईसाठी तेराही पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करण्यात आली होती़
आॅनलाइन दंडवसुली फेल
स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली़ या कारवाईदरम्यान, दंडवसुली सोईस्कर व्हावी यासाठी आॅनलाइन प्रणालीचा वापर करण्यात आला़ मात्र, दंडवसुलीसाठी ही कारवाई सपशेल फेल झाल्याचे समोर आले़ यावेळी नागरिकांच्या बँक खात्यातून पैसे कट झाले मात्र संदेश येत नसल्याने त्यांना कारवाईच्या ठिकाणी तिष्ठत बसावे लागले़
पोलिसांची गोपनीय कारवाई व्हाट््स अ‍ॅपवर
शुक्रवारी हेल्मेट व सीटबेल्ट कारवाई केली जाणार असल्याचे व्हॉट््स अ‍ॅपवर व्हायरल करण्यात आले होते़ तसेच वृत्तपत्रामधूनही या कारवाईबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते़ मात्र, असे असूनही बहुतांशी वाहनचालकांनी पोलिसांची सूचना गांभीर्याने न घेतल्याने त्यांना आर्थिक झळ सोसावी लागली़, तर पोलिसांची गोपनीय कारवाई व्हाट््स अ‍ॅपवर व्हायरल झालीच कशी याबाबत चर्चा आहे़

Web Title: 'Helmet Drive' earns 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.