हॅलो, प्रभाग सभा आहे, या ना लवकर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:36 AM2017-11-22T00:36:28+5:302017-11-22T00:42:05+5:30

पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभेची ही औपचारिकता तरी कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे किती सदस्यांना प्रभागातील विविध विकासकामांची पोटतिडीक आहे हे यावरून दिसून येत आहे.

 Hello, there is a meeting place, this early! | हॅलो, प्रभाग सभा आहे, या ना लवकर!

हॅलो, प्रभाग सभा आहे, या ना लवकर!

Next
ठळक मुद्देसभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते.सभेच्या वेळेवर कोणी सदस्य उपस्थित राहत नाहीजीन सुफियान यांची अद्याप एकदाही उपस्थिती नाही

संजय शहाणे।
इंदिरानगर : पूर्व प्रभाग तसा बाहुबली नेत्यांचा. त्यामुळे प्रभाग सभेत उपस्थित राहिले ना राहिले तरी फरक पडत नाही, अशी मानसिकता असलेले पाठ फिरवतात. परिणामी प्रभाग सभेसाठी आवश्यक तो कोरमही पूर्ण होत नसल्याने सभापतींना फोन करून प्रत्येकाला बोलवावे लागते. त्यामुळे सभेची ही औपचारिकता तरी कशासाठी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे किती सदस्यांना प्रभागातील विविध विकासकामांची पोटतिडीक आहे हे यावरून दिसून येत आहे.
नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी निवडणूक लढविणाºया प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक सभांमध्ये नागरी प्रश्नांवर आवाज उठवू असाच वादा केला होता. मात्र प्रत्यक्षात प्रभाग समितीत त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत नाही.  दर महिन्याला प्रभाग समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे. परंतु यंदाच्या पंचवार्षिक कारकिर्दीला सुरुवात झाली तेव्हापासून पूर्व प्रभाग सभेचे दुर्भाग्य आहे की सभेच्या वेळेवर कोणी सदस्य उपस्थित राहत नाही. अशावेळी प्रभाग सभापतींनाच कोरम पूर्ण करण्यासाठी सदस्यांना फोन करून सभेस येण्यासाठी बोलवावे लागते. नेहमीच कोरम पूर्ण होण्यासाठी सुमारे अर्धा ते एक तास सभेस उशीर होत असल्याने अधिकारी खोळंबतात आणि नागरिकांची कामेही रखडतात. त्यामुळे सभेचे महत्त्व किती आहे याची जाणीव सदस्यांना नाही असे दिसून येते.
मनपाच्या उपस्थिती पत्रकावरून व प्रत्यक्ष पाहणीवरून आतापर्यंतची कामगिरी बघितली तर सभापती शाहीन मिर्झा, सतीश सोनवणे, श्याम बडोदे, डॉ. दीपाली कुलकर्णी, रूपाली निकुळे, सुषमा पगारे, आशा तडवी, सुमन भालेराव, अर्चना थोरात आधी सदस्य नियमिपणे सभेला उपस्थित राहतात. चंद्रकांत खोडे, सुप्रिया खोडे, अनिल ताजनपुरे, सतीश कुलकर्णी आदी सदस्य अधूनमधून प्रभागाला उपस्थित राहतात. उपमहापौर प्रथमेश गिते, शोभा साबळे, समिना मेमन, सय्यद मुशीर, राहुल दिवे आदींची एक ते दोन वेळा उपस्थिती आहे, तर जीन सुफियान यांची अद्याप एकदाही उपस्थिती दिसलेली नाही. काही नगरसेवक अशा सभेला येणे कमीपणाचे मानतात. आपले काम कसेही होते असे त्यांचा पवित्रा असतो. या उलट अनेक नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरतात आणि कामेही करून घेतात. परंतु बहुतांशी सभा त्याच त्या विषयावर गाजतात. त्यातून फारसे काही हाती पडत नसल्याने नगरसेवक बैठक टाळतात, असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे.

Web Title:  Hello, there is a meeting place, this early!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.