सटाण्यात आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:46 AM2019-06-10T01:46:16+5:302019-06-10T01:48:15+5:30

सटाणा : दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली न करता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासोबतच वीजबिल थकीत असलेल्या शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडू नका. बागलाण तालुक्यातील ज्या ५१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे अशा गावांना टँकरच्या फेºया वाढविण्यासोबतच ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे त्या गावांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून मुबलक पाणी उपलब्ध करून द्या तसेच आगामी खरीप हंगामात शेतकºयांना मुबलक बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी अधिकाºयांना दिले आहेत.

Held meeting review | सटाण्यात आढावा बैठक

सटाणा पंचायत समिती सभागृहात आयोजित दुष्काळी आढावा बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुभाष भामरे समवेत उपस्थितीत अधिकारी वर्ग.

Next
ठळक मुद्देसटाणा : बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे कनेक्शन न तोडण्याच्या सूचना

सटाणा : दुष्काळाने हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली न करता त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासोबतच वीजबिल थकीत असलेल्या शेतकºयांचे वीज कनेक्शन तोडू नका. बागलाण तालुक्यातील ज्या ५१ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे अशा गावांना टँकरच्या फेºया वाढविण्यासोबतच ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे त्या गावांचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करून मुबलक पाणी उपलब्ध करून द्या तसेच आगामी खरीप हंगामात शेतकºयांना मुबलक बी-बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी अधिकाºयांना दिले आहेत.
येथील पंचायत समिती सभागृहात शनिवारी (दि. ८) खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली बागलाण तालुक्यातील सर्व विभागप्रमुख, अधिकाºयांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भामरे बोलत होते.
या आढावा बैठकीला वाळू उपसा, अवैध वृक्षतोड, महावितरणची अरेरावी, बँकांकडून होणारी सक्तीची कर्जवसुली, डांगसौंदाणे येथे नुकताच कोसळलेला जलकुंभ याबाबत खासदार डॉ. भामरे यांच्याकडे तालुक्यातील शेकडो
नागरिकांनी अधिकाºयांसमक्ष गंभीर तक्रारी केल्याने डॉ. भामरे यांनी अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेत तुमचे धंदे आता बंद करा आणि बेकायदेशीर वाळू उपशासह रेशनचा काळाबाजार थांबवा, अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यासोबतच आगामी वृक्षलागवडीचे बागलाणमधून ४ लाख ६२ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.
डांगसौंदाणे येथील जलकुंभ कोसळून महिना लोटला तरी अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याची तक्रार एका नागरिकाने केल्यानंतर डॉ. भामरे यांनी या प्रकरणात दोषी असलेल्यांवर
कडक कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
आढावा बैठकीला प्रांत प्रवीण महाजन, तहसीलदार जितेंद्र इंगळे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांच्यासह वनविभाग, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, बँकांचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, पाटबंधारे विभाग यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, भाजपचे पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेतकºयाने कथन केली आप बिती; महावितरणचे अधिकारी घामाघूममहावितरणच्या ग्रामीण सहायक अभियंता कल्याणी भोये यांच्याबाबत तिळवण येथील एका शेतकºयाने संतापजनक आप बिती कथन केली. मी माझ्या घराचे वीजबिल वेळेवर भरत असतानाही कल्याणी भोये माझ्या घरी आल्या. माझा अपघात झाल्याने आणि दोन्ही पाय मोडलेले असताना घरात कोणीही नसताना भोये यांनी तुमच्या घराची झडती घ्यायची आहे असे सांगत काहीएक कारण नसताना त्यांनी घराची झडती घेत एकेरी भाषा वापरली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओच दाखविण्याची त्या शेतकºयाने तयारी दाखविल्याने खासदार डॉ. भामरे चांगलेच आक्र मक झाले. आढावा बैठकीला उपस्थित महावितरणच्या अधिकाºयांना डॉ. भामरे यांनी त्या महिला अधिकाºयाला निलंबित करा, असे फर्मान सोडल्याने महावितरणचे अधिकारी घामाघूम झालेले दिसले.

Web Title: Held meeting review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक