७०० थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 01:20 AM2018-06-26T01:20:26+5:302018-06-26T01:21:49+5:30

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरुद्ध पुन्हा वसुली मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्यातील ७०० बड्या कर्जदारांकडे तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे पाहून त्यांनी कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या स्थावर मालमत्ता जप्त करून नजीकच्या काळात त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. बॅँकेच्या एकूण कर्जापैकी ७४२.५४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, त्यात १२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

The heel of 700 arrears property | ७०० थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच

७०० थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा बॅँक : १२५ वाहने जप्त; जूनअखेर ७४२ कोटी रुपयांची वसुली

नाशिक : जिल्हा बॅँकेने थकबाकीदारांविरुद्ध पुन्हा वसुली मोहीम हाती घेतली असून, जिल्ह्यातील ७०० बड्या कर्जदारांकडे तगादा लावूनही वसुली होत नसल्याचे पाहून त्यांनी कर्ज घेतेवेळी तारण ठेवलेल्या स्थावर मालमत्ता जप्त करून नजीकच्या काळात त्यांचा लिलाव करण्याचे ठरविले आहे. बॅँकेच्या एकूण कर्जापैकी ७४२.५४ कोटी रुपये वसूल करण्यात आले असून, त्यात १२५ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
जिल्हा बॅँकेने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात वसुलीचे उद्दिष्ट पाहता बँकेची एकूण वसुलीस पात्र रक्कम २७६९.६१ कोटी असून, मार्च २०१८ अखेर ५३५.६८ मुद्दल १९ टक्के व व्याजाची रु. २६०.६७ कोटी रक्कम वसूल झाली आहे. बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ज्या पद्धतीने कर्ज वसुलीसाठी जिल्ह्यातील बँकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन कर्ज वसुलीचे प्रयत्न केले होते त्यात जंगम जप्तीद्वारे थकबाकी झालेले वाहने म्हणजे ट्रॅक्टर, जीप, मोटरसायकल अशा सुमारे १२५ वाहनांची जप्ती करून लिलावाद्वारे २ कोटी रकमेची वसुली करण्यात आली आहे. जूनअखेर वसुलीस पात्र २७६९.६१ कोटी रकमेपोटी एकूण मुद्दल रु. ६७३.९४ व व्याज रु. २६८.६० कोटी कर्ज वसुली म्हणजे २४.३९ टक्के झाली आहे. जून २०१८ अखेर जास्तीत जास्त कर्ज वसुली होणेसाठी १ जूनपासून परत कर्ज वसुली मोहीम राबवून व जुने तसेच ऐपतदार थकबाकीदारांचे बँकेच्या वसुली अधिकाºयांना प्राप्त १५६ अधिकारान्वये सहकार कायदा १९६० चे कलम १०७ नुसार जप्ती करून लिलावप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील सुमारे ७०० थकबाकीदारांचे स्थावर जप्ती आदेश बजावण्यात आले आहेत. उर्वरित थकबाकीदारांवर जप्ती आदेश काढण्यात येणार आहे.एक वेळ समझोता योजनाशासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकºयाकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखावरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत, अशा शेतकºयांनी दीड लाखावरील त्याच्या हिश्शाच्या रकमेचा भरणा केल्यानंतर शासनाकडून ‘एक वेळ समझोता योजना’अंतर्गत दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील २१७०० खातेदारांपैकी फक्त ११००० खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सदर योजनेची अंतिम मुदत ३० जूनपर्यंतच असल्याने उर्वरित खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The heel of 700 arrears property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.