पवार यांच्या याचिकेवर ६ फेब्रुवारीला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:54 AM2019-01-18T00:54:47+5:302019-01-18T00:55:37+5:30

महापालिकेचे माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी आपल्यावरील चौकशी आणि दोषारोप पत्राला दिलेल्या आव्हानाच्या याचिकेवर आता ६ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे.

Hearing on Pawar's petition on 6th February | पवार यांच्या याचिकेवर ६ फेब्रुवारीला सुनावणी

पवार यांच्या याचिकेवर ६ फेब्रुवारीला सुनावणी

Next

नाशिक : महापालिकेचे माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी आपल्यावरील चौकशी आणि दोषारोप पत्राला दिलेल्या आव्हानाच्या याचिकेवर आता ६ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे.
गेल्या वर्षी उत्तम पवार हे सेवेतून निवृत्त झाले. तथापि, महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे असताना त्यांनी पवार यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ई-कनेक्ट अ‍ॅपद्वारे आलेल्या तक्रारींचे निवारण न करणे, महासभेतील ठरावानंतर विलंबाने निविदा काढणे तसेच आर्थिक तरतूद नसताना अडीचशे कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढणे असे अनेक आरोप ठेवले होते आणि त्याची चौकशी करण्यात येणार होेती. महापालिकेने चौकशी अधिकारी म्हणून बी. सी. हांगे यांची नियुक्ती केली आहे. हांगे यांची वेतनश्रेणी बघता हे क आणि ड या वर्गातील कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात, आपली वरिष्ठ अधिकाºयाची वेतनश्रेणी असल्याने ते चौकशीस सक्षम अधिकारी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सर्व संबंधितांना १६ जानेवारीस हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आता ही सुनवाणी होऊ शकली नाही आता ही सुनावणी ६ फेबु्रवारीस होणार आहे.

Web Title: Hearing on Pawar's petition on 6th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.