नाशिकमधील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर २१ मे पासून सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 04:28 PM2019-05-15T16:28:44+5:302019-05-15T16:30:11+5:30

नाशिक- शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर येत्या २१ मेपासून विभाग निहाय सुनवाणी होणा असून त्यानंतर धार्मिक स्थळे निष्कासीत करण्यात येणार आहे. दरम्यान, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी केलेला ठराव राज्यशासनाकडे पडून असून त्याचा पाठपुरावा करण्यात आमदार अयशस्वी झाल्याने मंदिर मठ बचाव समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Hearing on the objections to illegal religious places in Nashik from May 21 | नाशिकमधील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर २१ मे पासून सुनावणी

नाशिकमधील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर २१ मे पासून सुनावणी

Next
ठळक मुद्देशहरात ६४७ बेकायदा धार्मिक स्थळे१८४ हरकती घेण्यात आल्या आहेत

नाशिक- शहरातील बेकायदा धार्मिक स्थळांवरील हरकतींवर येत्या २१ मेपासून विभाग निहाय सुनवाणी होणा असून त्यानंतर धार्मिक स्थळे निष्कासीत करण्यात येणार आहे. दरम्यान, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी केलेला ठराव राज्यशासनाकडे पडून असून त्याचा पाठपुरावा करण्यात आमदार अयशस्वी झाल्याने मंदिर मठ बचाव समितीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उच्च न्यायालयात दाखल जनाहित याचिकेवरील सुनावणीच्या आधारे महापालिकेने यापूर्वी काही धार्मिक स्थळे निष्कासीत केली आहेत. उर्वरीत धार्मिक स्थळे चालू वर्षी हटविण्यात येणार होती मात्र मंदिर मठ बचाव समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली. आणि यापूर्वी महापालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने महपाालिकेला नव्याने सर्वेक्षण आणि पुढिल कार्यवाहीचे आदेश दिले होते. महापालिकेने ६४७ बेकायदा धार्मिक स्थळे शोधून काढली असून त्याची यादी जाहिर केली होती. त्यावर १८४ हरकती घेण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हरीभाऊ फडोळ यांच्या अध्यक्षतेखालील समिती येत्या २१ मे पासून सुनावणी करणार आहे. नाशिक पूर्व विभाागात ४९ हरकती घेण्यात आल्या असून तेथूनच सुनावणी सुरू होणार आहे. त्यानंतर नाशिक पश्चिम विभागात १५ हरकती असून त्यावर २२ मे रोजी सुनावणी होईल. नाशिकरोड येथे १० हरकती असून त्यावर २२ मे, सिडकोतील ४० हरकती असून त्यावर २३ मेस सुनावणी होईल तर सातपूर येथे ३० हरकतींवर २४ मे तर पंचवटी विभागातील ४० हरकतींवर २७ मेस सुनावणी होईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

Web Title: Hearing on the objections to illegal religious places in Nashik from May 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.