मनपा मुख्यालयाच्या जागेत हजेरी शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:10 AM2019-03-21T00:10:08+5:302019-03-21T00:10:24+5:30

महापालिकेच्या राजीव गांधी भवनात काम करणाऱ्या वीस सफाई कामगारांच्या हजेरीसाठी जागा मिळत नसल्याने तिसऱ्या मजल्यावरील महिलांच्या प्रसाधनगृहातच भांडार आणि हजेरी शेड तयार करण्यात आले,

Hazardous shed in Municipal Headquarters | मनपा मुख्यालयाच्या जागेत हजेरी शेड

मनपा मुख्यालयाच्या जागेत हजेरी शेड

Next

नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवनात काम करणाऱ्या वीस सफाई कामगारांच्या हजेरीसाठी जागा मिळत नसल्याने तिसऱ्या मजल्यावरील महिलांच्या प्रसाधनगृहातच भांडार आणि हजेरी शेड तयार करण्यात आले, परंतु त्याला कडाडून विरोध झाल्यानंतर मात्र आता ते पदाधिकाऱ्यांसाठी राखीव वाहनतळाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
सफाई कामगारांना रोज सकाळी कामावर आल्यानंतर हजेरी द्यावी लागते आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली जाते. राजीव गांधी भवनातील वीस सफाई कामगार सकाळी कामावर आल्यानंतर त्यांच्या हजेरीचा आणि स्वच्छतेची साधने ठेवण्यासाठी जागा नसल्याने राजीव गांधी भवनच्या परिसरातील एका खासगी हॉटेल व्यावसायिकाच्या जागेचा वापर केला जात होता. मात्र दोन दिवसांपूर्वी तिसºया मजल्यावरील महिलांचे प्रसाधनगृह बंद करून त्यात हजेरी शेड करण्यात आले, तसेच भांडारदेखील साकारून स्वच्छतेची साधने ठेवण्यात आली होती. महिला नगरसेवकांना मुळातच स्वतंत्र दालन नव्हते ते मिळाले तर आता त्याच्या जवळील प्रसाधनगृहच बंद करण्यात आले. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावर टीका होऊ लागली त्यामुळे त्यांनी तेथील कार्यालय स्थलांतरित करून थेट वाहनतळाच्या जागेत नेले आहे.

Web Title: Hazardous shed in Municipal Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.