मनपात नोकरी देण्याचा प्रश्न विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:51 AM2017-08-29T01:51:38+5:302017-08-29T01:51:43+5:30

मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले.

Have a question regarding employment in the mantra | मनपात नोकरी देण्याचा प्रश्न विचाराधीन

मनपात नोकरी देण्याचा प्रश्न विचाराधीन

Next

घोटी : मुकणे धरणग्रस्तांच्या प्रश्नावर महापालिका व धरणग्रस्त यांच्यात मध्यस्थी करून स्थानिकांना नोकरी देण्याच्या प्रश्नावर नक्कीच मार्ग काढला जाईल, असे आश्वासन नाशिकचे जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी मुकणे धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले. मुकणे धरणातून नाशिक महानगरपालिकेला पाणी देण्याच्या बदल्यात धरणग्रस्तांना महापालिकेत नोकरीत सामावून घ्यावे या मागणीसाठी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाची इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासमवेत सोमवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी महापालिकेत बैठक घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी केल्या.या विषयावर धरणग्रस्तांसाठी सकारात्मकतेने विचार करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी दिले. नाशिक महापालिकेला मुकणे धरणातून थेट पाणी देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु धरणग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने इगतपुरीच्या आमदार गावित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, महापालिकेचे कार्यकारी अभियंता एस. एम. चव्हाणके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. शिंदे यांच्यासमवेत मुकणे धरणग्रस्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिष्टमंडळात वाडीवºहेचे सरपंच रावसाहेब कातोरे, विलास मालुंजकर, दिलीप शेजवळ, जगन राव, काशीनाथ बोराडे, दशरथ जमधडे, काशीनाथ गोवर्धने, सचिन मते, बस्तीराम खातळे, गणेश खकाळे, बाळासाहेब गोरे, कैलास जाधव, गुलाब वाजे,भास्कर आवारी, शिवाजी गायकर,भास्कर खातळे, रंगनाथ खातळे, अंबादास कातोरे, करू गोवर्धने, संपत वाजे,विष्णुं शिंदे, विष्णू मालुंजकर यांसह असंख्य धरणग्रस्त उपस्थित होते.

Web Title: Have a question regarding employment in the mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.