‘हॅट्रीक’ची संधी हुकली : वनमहोत्सवात नाशिकचा दुसरा क्रमांक

By azhar.sheikh | Published: August 1, 2018 03:29 PM2018-08-01T15:29:22+5:302018-08-01T15:34:08+5:30

वनमहोत्सवाच्या पहिल्या वर्षी २०१६साली २ कोटी रोपे लागवडीच्या नाशिक राज्यात प्रथम होते. तसेच २०१७ साली ४ कोटी रोप लागवडीचे राज्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक ३४८७७९० इतके रोपे लावून राज्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावर्षी नाशिकची ‘हॅट्रीक’ करण्याची संधी हुकली.

Hattrick missed the opportunity: Nashik second place in the forestfest | ‘हॅट्रीक’ची संधी हुकली : वनमहोत्सवात नाशिकचा दुसरा क्रमांक

‘हॅट्रीक’ची संधी हुकली : वनमहोत्सवात नाशिकचा दुसरा क्रमांक

Next
ठळक मुद्दे यावर्षी नाशिकची ‘हॅट्रीक’ करण्याची संधी हुकली

नाशिक : राज्य सरकारच्या वनमंत्रालयाने यावर्षी १३ कोटी रोपांच्या लागवडीचा राज्यस्तरीय संकल्प सोडला होता. नाशिक जिल्ह्यात १० हजार ९५९ ठिकाणी एकूण ७२ लाख ३५ हजार ६५२ रोपे लावण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला आहे. वनमहोत्सवात राज्यात नाशिकने बाजी मारली असून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. राहिले. ७२ लाख २५ हजार ४०७ इतके रोप लागवडीचे उद्दिष्ट नाशिकला देण्यात आले होते. प्रथम क्रमांक नांदेड जिल्ह्याने पटकाविला असून तृतीय क्रमांक चंद्रपूरने राखला आहे. वनमहोत्सवाच्या पहिल्या वर्षी २०१६साली २ कोटी रोपे लागवडीच्या नाशिक राज्यात प्रथम होते. तसेच २०१७ साली ४ कोटी रोप लागवडीचे राज्याचे उद्दिष्ट होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्याने सर्वाधिक ३४,८७,७९० इतके रोपे लावून राज्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकाविला होता. यावर्षी नाशिकची ‘हॅट्रीक’ करण्याची संधी हुकली. तपमानवाढीचे गडद होणारे संकट, हवामान व ऋ तू बदलाची दाहकता कमी करण्यासाठी वृक्षलागवड-संवर्धनाचा एकमेव पर्याय असल्याचे जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे. राज्यात वनांचे आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाचे महत्त्व ओळखून ‘वनमहोत्सव’ हा वन मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर १ जुलैपासून वनमहोत्सवाला यंदा सुरुवात करण्यात आली होती. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लागवड करीत वनमहोत्सव साजरा केला. यामुळे नाशिक जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा अधिक रोपांची लागवड करण्यास यश आले. मंगळवारी (दि.३१) या अभियानाचा समारोप वनविभागाकडून करण्यात आला. म्हसरूळ शिवारातील वनविभागाच्या आगारामधील जागेत सुमारे शंभराहून अधिक वाढीव रोपांची लागवड आपलं पर्यावरण संस्थेच्या सहकार्याने समारोपप्रसंगी करण्यात आली. यावेळी सहायक वनसंरक्षक स्वप्नील घुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार, संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांच्यासह वनकर्मचारी, नागरिक उपस्थित होते. वनविभागाकडून ५० लाख २६ हजार रोपांची लागवड वनविभागाने ४७ लाख ६० हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते; मात्र त्यापेक्षा अधिक सुमारे ५० लाख २६ हजार १९६ रोपे जिल्हाभरात नाशिक पूर्व, पश्चिम व मालेगाव उपविभागासह वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरणाच्या वतीने लावण्यात आली. जिल्ह्यातील ६ हजार ४१७ ग्रामपंचायतींना मिळून १६ लाख ४४ हजार ९४५ रोपे लागवडीचे उद्दिष्ट होते त्यापैकी १४ लाख ७८ हजार रोपे लागवड करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना यश आले.

Web Title: Hattrick missed the opportunity: Nashik second place in the forestfest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.