हर हर महादेव... जय भोले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 01:50 AM2019-03-05T01:50:02+5:302019-03-05T01:50:30+5:30

हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत हजारो भाविकांनी शहरातील महादेवाच्या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्र सर्वत्र साजरी झाली.

 Har Har Mahadev ... Jai Bhole ... | हर हर महादेव... जय भोले...

हर हर महादेव... जय भोले...

Next

नाशिक : हर हर महादेव... जय भोले... बम बम भोलेचा गजर करत हजारो भाविकांनी शहरातील महादेवाच्या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांनी पारंपरिक पद्धतीने महाशिवरात्र सर्वत्र साजरी झाली. विशेष म्हणजे यंदा महाशिवरात्र भगवान शंकराचा वार असलेल्या सोमवारी (दि.४) आल्याने ही पर्वणी साधत मोठ्या प्रमाणावर अभिषेक करण्यात आले.
दरम्यान, प्रयागराज कुंभमेळ्याची आज शेवटची पर्वणी असल्याने जे भाविक प्रयागराजला जाऊ शकले नाहीत त्यांनी दक्षिण गंगा असलेल्या गोदावरीत पवित्र स्नान केले. गोदावरीला पाणी सोडलेले असल्याने राज्यभरातून तसेच परराज्यातून आलेल्या भाविकांची रामकुंडावर गर्दी झाली होती.
माघ कृष्ण चतुर्दशीला साजरी होणारी शिवरात्र धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाची मानली जाते. या रात्रीला महाशिवरात्र नावाने संबोधले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. यादिवशी कुटुंबातील सर्वच जण उपवास करतात. भगवान शंकराचे स्मरण करीत महादेव मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवर बेलपुष्प अर्पण करून दुधाचा अभिषेक भाविकांकडून केला गेला. भगवान शिवशंकराची आराधना करीत महाशिवरात्रीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.५) सांगता शिवभक्तांकडून केली जाणार आहे. उत्तर भारतात महाशिवरात्र फाल्गून महिन्यात साजरी होते.
पृथ्वीच्या निर्मितीप्रसंगी भगवान शंकरांनी याच तिथीला मध्यरात्री रौद्ररूप धारण केले होते, अशी मान्यता आहे.
भाविकांची दर्शनासाठी रीघ
सोमेश्वर मंदिरात महाशिवरात्रनिमित्त सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. मंदिरात विश्वस्त मंडळाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पंचवटी मानेनगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्ताने ओंकारेश्वर मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. तपोवनात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महारुद्र अनुष्ठान सोहळा सुरू होता.

Web Title:  Har Har Mahadev ... Jai Bhole ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.