शहरातून अर्धा डझन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 01:00 AM2017-08-18T01:00:36+5:302017-08-18T01:00:40+5:30

नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये उभ्या केलेल्या नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी कायम असून, शहरातील विविध भागांमधून सहा दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.

 Half a dozen bicycle lamps from the city | शहरातून अर्धा डझन दुचाकी लंपास

शहरातून अर्धा डझन दुचाकी लंपास

Next

नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये उभ्या केलेल्या नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांची वक्रदृष्टी कायम असून, शहरातील विविध भागांमधून सहा दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे.
जुन्या नाशकातील जुनी तांबट लेन परिसरातील ललित विनोद अंबाडकर यांची पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, डीझेड ०९३९) त्यांच्या गोपाल कृष्ण सोसायटीच्या वाहनतळामधून चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील वासननगर येथे राहणारे अरविंद कानोबा राणे बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कामानिमित्त अंबड एमआयडीसीतील नागरे इंडस्ट्रीज या कारखान्यात गेले असता वाहनतळात लावलेली त्यांची दुचाकी (एमएच १५, ईएन ६४७७) चोरट्यांनी चोरून नेली. तिसºया घटनेत नाशिकरोडच्या आशानगर भागात राहणारे माधव गणपत गायकवाड हे सिन्नर फाटा येथे गेले असता अज्ञात चोरट्यांनी हॉटेलसमोर उभी केलेली त्यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५, सीई ११७२) चोरून नेली. चौथ्या घटनेत सिडकोतील महाजननगर भागात राजेंद्रकुमार प्रेमजी मिनीपरा (रा. बिजेस सोसायटीजवळ) यांची मोटारसायकल (एमएच १५, डीए ६१४४) रात्री सोसायटीच्या वाहनतळातून पळवून नेली. पाचव्या घटनेत बिटको महाविद्यालयातून राजाराम रामचंद्र टिळे यांची प्लेझर (एमएच १५, डीव्ही ००८५) दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. सहावी घटना श्रमिकनगर भागात घडली. सुनील भिला चौधरी यांची बुलेट (एमएच १५, एफपी १७३८) शनिवारी रात्री त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली.

Web Title:  Half a dozen bicycle lamps from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.