संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमीनिमित्त ज्ञानदीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:54 PM2018-10-18T17:54:22+5:302018-10-18T17:54:55+5:30

वावी : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वावी येथील संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमी निमित्त ज्ञानदिप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना अक्षरे गिरविण्याची धडे मातांच्याहस्ते देण्यात आले.

Gyanadeep at Sanjivani Balak temple on the occasion of Lalita Panchami | संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमीनिमित्त ज्ञानदीप

संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमीनिमित्त ज्ञानदीप

Next

वावी : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वावी येथील संजीवनी बालक मंदिरात ललिता पंचमी निमित्त ज्ञानदिप प्रज्वलित करून विद्यार्थ्यांना अक्षरे गिरविण्याची धडे मातांच्याहस्ते देण्यात आले.
ललिता पंचमीच्या दिवशी साडे ते पाच वर्षांच्या बालकाच्या शिक्षणाची सुरूवात त्यांच्या मातांकडून काही अक्षरे गिरवून घेवून तसेच बालकाच्या कानात ती अक्षरे सांगून त्यांच्याकडून वदवून घेवून अग्निच्या साक्षीने करण्यात येते. ही परंपरा आपल्याकडे पुरातन काळापासून सुरू आहे.
गावातील राममंदिरापर्यंत बालकांनी गीता पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुलींनी कलश डोक्यावर घेतले होते. माता-पालकही या पालखी साहेळ्यात सहभागी झाले होते. यावेळी राहुल मुळे व पालकांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले. बालक मंदिरात शिक्षिका निर्मला देव्हाड यांनी ललिता पंचमीचे महत्व उपस्थितांना सांगितले. त्यानंतर होम हवन करण्यात आला. मातांनी आपल्या बालकांना मांडीवर बसवून गायत्री मंत्र म्हणून आहुती दिल्या व पाटीवर आपल्या बालकांकडून ॐ व श्री ही अक्षरे बालकांचा हात धरून गिरवून घेतला. तसेच ती अक्षरे बालकांच्या कानात सांगून त्यांच्याकडून वदवून घेतली. हा ललित पंचमीचा संस्कार बालकांवर केला. ललित पंचमीच्या दिवशी ‘ज्ञानदिप’ प्रज्वलित करण्याचा हा पुरातन संस्कार आपल्या पाल्यावर केल्याचे वेगळेच समाधान व आनंद पालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. राहुल मुळे यांनी उपस्थित पालकांचे आभार मानले. उषा गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Gyanadeep at Sanjivani Balak temple on the occasion of Lalita Panchami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.