सुदृढ समाज निर्मितीसाठी महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 05:55 PM2019-05-04T17:55:40+5:302019-05-04T17:55:58+5:30

सिन्नर : महिला कुटुंब आणि समाज निर्मितीच्या आधार असून सुदृढ कुटुंब व समाज निर्मितीसाठी महिलांनी आपल्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेवून शरीर निरोगी ठेवावे असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.

Guide to women for the creation of a healthy society | सुदृढ समाज निर्मितीसाठी महिलांना मार्गदर्शन

सुदृढ समाज निर्मितीसाठी महिलांना मार्गदर्शन

googlenewsNext

सिन्नर : महिला कुटुंब आणि समाज निर्मितीच्या आधार असून सुदृढ कुटुंब व समाज निर्मितीसाठी महिलांनी आपल्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेवून शरीर निरोगी ठेवावे असे आवाहन सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.
येथील कामगार शक्ती फाउंडेशन अंतर्गत महिला गृह उद्योगाच्या महिलांनी सुरू केलेल्या वुमन्स हेल्थ केअर व बिझनेस सिस्टिम संस्थेच्या शुभारंभाप्रसंगी त्या मार्गदर्शन करत होत्या. व्यासपीठावर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नेहा लाड, सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या उपाध्यक्ष सौ. मीनाक्षी दळवी, संस्थेच्या प्रमुख प्रमिला सरवार, डॉ. वैष्णवी नेहे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वावलंबी स्त्री ही समाजासाठी भुषणावह बाब आहे. त्यामुळे स्त्रीयांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या महिलांना स्वत:च्या आरोग्याबाबत अधिक दक्ष रहावे असे आवाहनही उसगावकर यांनी केले. आरोग्य सुदृढ ठेवून महिलांनी स्वत:सोबत कुटुंबाचे आयुष्यमान वाढवावे, असा सल्लाही उसगावकर यांनी उपस्थित महिलांना दिला.

Web Title: Guide to women for the creation of a healthy society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.