नाशिक  शहरातील  कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:58 AM2018-05-20T00:58:40+5:302018-05-20T00:58:40+5:30

कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भाजपाला धोबीपछाड मिळाल्याने शहरातील कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

 Greetings of Congress workers in Nashik City | नाशिक  शहरातील  कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

नाशिक  शहरातील  कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

Next

नाशिक : कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि भाजपाला धोबीपछाड मिळाल्याने शहरातील कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.  यावेळी कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्नाटकातील घटनेमुळे लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, देशात दंडेलशाही चालणार नाही, याचा धडा भाजपाला मिळाल्याची प्रतिक्रिया युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल दिवे, माजी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केला. या आनंदोत्सवात सुनील आव्हाड, नितीन काकड, सचिन भुजबळ, महेश बाफना, कुशल लुथरा, जयेश सोनवणे, मिलिंद हांडोरे, मनोज पाईकराव, भूषण चौधरी, हरेंद्र पगारे, तुषार सोनकांबळे, आकाश रणशूर, अमोल पाईकराव, गौरव केदारे, संजय लोखंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Web Title:  Greetings of Congress workers in Nashik City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.