महिंद्राच्या ‘मराझ्झो’चे नाशकात ग्रँड लाँचिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 05:28 PM2018-09-03T17:28:53+5:302018-09-03T17:32:11+5:30

देशभरात विविध सणउत्सवांची धूम सुरू होत असताना विविध वाहन उत्पादक कंपन्या ही उत्सवांची  बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्या कारचे नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत असताना महिंद्राने ‘मराझ्झो’ या प्रवसी श्रेणीतील कारचे दिमाखदार सादरीकरण केले असून, ही कार बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

Grand Launching in Mahindra's 'Marazza' Nashik Nashik | महिंद्राच्या ‘मराझ्झो’चे नाशकात ग्रँड लाँचिंग

महिंद्राच्या ‘मराझ्झो’चे नाशकात ग्रँड लाँचिंग

Next
ठळक मुद्देमहिंद्राच्या नवीन मराझ्झो कारचे लॉचिंगप्रवासी वाहनांच्या श्रेणीत महिंद्राची स्पर्धा

नाशिक : सध्या देशभरात विविध सणउत्सवांची धूम सुरू होत असताना विविध वाहन उत्पादक कंपन्या ही उत्सवांची  बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्या कारचे नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत असताना महिंद्राने ‘मराझ्झो’ या प्रवसी श्रेणीतील कारचे दिमाखदार सादरीकरण केले असून, ही कार बाजारात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात सोमवारी (दि.३) महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका, वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वडेरा यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. महिंद्राची ‘मराझ्झो’ वेगवेगळ्या श्रेणीत सादर करण्यात आली असून, हिची किंमत नऊ लाख ९९ हजार ते १३ लाख ९० रुपयांपर्यंत असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. इको ड्रायव्हिंग मोड, लेदर सीट, टचस्क्रीन एन्फोऐंटेटंमेंट सिस्टीम अशा विविध सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये महिंद्राच्या कारखान्यात निर्मिती होणाºया बोलेरो, झायलो, स्कॉर्पिओ या वाहनांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असून, नव्याने येऊ घातलेल्या इलेक्ट्रिक कार ‘इ-व्हेरिटो’चे उत्पादनही नाशिकमध्ये वेगाने सुरू आहे. यात नव्या मरोझ्झोच्या निर्मितीमुळे नाशिकमधील वाहननिर्मिती प्रक्रियेला चालना मिळणार आहे. महिंद्राच्या नाशिकसह चेन्नई, अमेरिकेतील महिंद्रा आॅटोमोटिव्ह अमेरिका(माना) आणि महिंद्रा रिसर्च व्हॅली (एमआरव्ही), डेट्राइटची इंजिनिअरिंग टीम आणि इटलीच्या पिनिनफरीनाच्या संयुक्त प्रयत्नातून मराझ्झोच्या निर्मिती झाली आहे.

शार्क माशाप्रमाणे दिसणारी ‘मराझ्झो’ जलद आणि टिकावू असून, कुटुंबासाठी एक परिपूर्ण कार आहे, तिच्यातून सात ते आठ व्यक्ती आरामात प्रवास करू शकतात. सुरक्षा आणि आधुनिक तेच्या सर्वसुविधांनी युक्त ही कार शार्कप्रमाणेच दीर्घकाळ टिकणारी आणी चपळ असल्याची अनुभूती ग्राहकांना नक्कीच मिळेल- आनंद महिंद्रा, कार्यकारी अध्यक्ष, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा लि.

नाशिकमध्ये ‘मराझ्झो’च्या निर्मितीमुळे स्थानिक रोजगारातही भर पडणार आहे. नवीन वाहनांच्या निर्मितीसाठी वाढीव मन्युष्यबळासह पुरवठादारांचेही काम वाढणार असल्याने नाशिकमधील रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून, किमान २५ टक्के रोजगार वाढू शकेल. मराझ्झोच्या निर्मितीसाठी एकूण १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक के ली आहे. -डॉ. पवन गोयंका, व्यवस्थापकीय संचालक, महिंद्रा अँड महिंद्रा लि.
 

Web Title: Grand Launching in Mahindra's 'Marazza' Nashik Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.