५१ सैनिकांच्या मातांचा ग्रामगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:54 AM2019-02-20T00:54:03+5:302019-02-20T00:56:14+5:30

लोहोणेर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांना व सैनिकांच्या कुटुंबीयांना बळ देण्याच्या उद्देशाने खुंटेवाडी (ता. देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त सैनिकांच्या मातांना ‘सैनिक माता ग्रामगौरव’ या सन्मानाने गौरविण्यात आले.

Gramaurav of mother of 51 soldiers | ५१ सैनिकांच्या मातांचा ग्रामगौरव

खुंटेवाडी (देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त गौरविण्यात आलेल्या सैनिकांच्या माता. समवेत उपसरपंच भाऊसाहेब पगार, आर.के. पवार, जिभाऊ भामरे, पंडितराव पगार.

Next
ठळक मुद्दे गाव भगवेमय झाले होते.

लोहोणेर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांनासैनिकांच्या कुटुंबीयांना बळ देण्याच्या उद्देशाने खुंटेवाडी
(ता. देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त सैनिकांच्या मातांना ‘सैनिक माता ग्रामगौरव’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी येथील जिव्हाळा बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष आर.के. पवार होते. खुंटेवाडी हे सैनिकांचे गाव आहे.
येथील ५१ पेक्षा जास्त युवक हे संरक्षण क्षेत्रात आहेत. या सैनिकांचा गावाला अभिमान असून, प्रत्येक राष्ट्रीय उत्सवाला सुटीवर आलेल्या सैनिकांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. या सैनिकांना शिकवण व पाठबळ देणाऱ्या ५१ मातांचा सन्मान शिवजयंतीनिमित्त करण्यात
आला. उपसरपंच भाऊसाहेब पगार व शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक उपसरपंच भाऊसाहेब पगार यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश सावकार, कल्पना भामरे, जिभाऊ भामरे, पंडितराव पगार, बाळासाहेब भामरे, उद्धव भामरे, देवा भामरे, नानाजी सावकार, केवळराव भामरे, डॉ. निंबा भामरे, एन.एस. भामरे, पोलीसपाटील कल्पना भामरे, सेवानिवृत्त शिक्षक निंबाजी पगार, गंगाधर भामरे, भीमराव रौंदळ, भीमराव सावकार उपस्थित होते. प्रा. बापू रौंदळ यांनी सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक पी.के. सूर्यवंशी यांनी आभार मानले.गावातून वेशभूषा केलेल्या बालशिवराजे, जिजाऊ, सईबाई व मावळे यांची घोड्यावर बसवून लेझीम पथकाच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. आयुष शशिकांत भामरे या बालव्याख्यात्याने भाषण केले. प्राजक्ता तायडे हिने शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. यावेळी गावातील प्रत्येक घरावर भगवा झेंडा लावण्यात आला होता. त्यामुळे गाव भगवेमय झाले होते.

Web Title: Gramaurav of mother of 51 soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक