दादासाहेब बिडकर महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:11 PM2018-03-20T14:11:49+5:302018-03-20T14:11:49+5:30

पेठ -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादासाहेब बिडकर कला, व विज्ञान महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने ११२ वा पदवीग्रहण सोहळा तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Graduation ceremony at Dadasaheb Bidar College | दादासाहेब बिडकर महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

दादासाहेब बिडकर महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ

googlenewsNext

पेठ -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादासाहेब बिडकर कला, व विज्ञान महाविद्यालय पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने ११२ वा पदवीग्रहण सोहळा तहसीलदार हरिष भामरे यांच्या उपस्थितीत पार पडला. प्राचार्य आर.बी.टोचे यांनी आपल्या प्रास्तविकात शालेय शिक्षण व व्यवहारीक शिक्षण यातील फरक स्पष्ट करतांना जीवनातील पाच तत्वांचा उल्लेख केला. तहसीलदार हरिष भामरे यांनी आपल्या दीक्षांत मनोगतात पदवी हा आपल्या जीवनातील महत्वाचा टप्पा असून पदवीनंतर खऱ्या अर्थाने माणूस आपले ध्येय गाठण्यासाठी सज्ज होत असतो असे सागितले. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर यांनी पदग्रहण सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आनंदमय सोहळा असतो. पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरावी असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयातील पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सायखेडा महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.व्ही.एम. पवार, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, प्राचार्य डॉ.आर.बी.टोचे, विद्यार्थी प्रतिनिधी संजय जाधव, महाविद्यालय परीक्षा आधिकारी प्रा.डॉ.एस.के. मगरे, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा.सी.बी. सैंदाणे, प्रा. श्रीहरी थोरवत, प्रा.के.एच. पाटील यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. श्रीमती शिरसाठ यांनी सुत्रसंचलन तर प्रा. प्रशांत निकम यांनी आभार मानले.

Web Title: Graduation ceremony at Dadasaheb Bidar College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक