लग्नातील मानपानाचा खर्च टाळून गोशाळेला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 05:15 PM2019-02-13T17:15:47+5:302019-02-13T17:18:23+5:30

नांदूरशिंगोटे : लग्न समारंभ म्हटले की, मान-सन्मान व त्यानिमित्ताने टॉवेल, टोपी, फेटे आदींवर वारेमाप खर्च केला जातो. सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका विवाहात नवदाम्पत्यासह त्यांच्या नातेवाईकांनी अशा खर्चाला फाटा देत गोसेवेचे व्रत जोपासणाऱ्या सिन्नर येथील हरिओम गोशाळेला २१ हजारांची देणगी दिली. या आदर्शवत उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 Goshala help by avoiding the cost of marriage | लग्नातील मानपानाचा खर्च टाळून गोशाळेला मदत

लग्नातील मानपानाचा खर्च टाळून गोशाळेला मदत

Next

कै. गंगाधरदादा चोथवे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राहुल चोथवे, उपाध्यक्ष महेंद्रकुमार तारगे यांच्याकडे सभारंभातच २१ हजार रूपयांची मदत सुपुर्द करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील रामनाथ चकोर यांची कन्या रूपाली व राहुरी (ता.नाशिक) येथील चंद्रकांत सांगळे यांचे चिरंजीव मंगेश यांचा विवाह सोहळा नुकताच नांदूरशिंगोटे येथे पार पडला. या लग्न समारंभात नवदाम्पत्य व त्यांच्या नातेवाईकांनी शाल, फेटे, टॉवेल, टोपी याचा खर्च टाळण्याचा निर्णय घेतला. सिन्नर येथे नाशिक-पुणे महामार्गालगत जिंदाल फाट्यासमोर चोथवे कुटुंबियांच्यावतीने हरिओम गोशाळेच्या माध्यमाने २५० ते ३०० भाकड गायींचा सांभाळ केला जातो. गायींचा सांभाळ करण्यासाठी अध्यक्ष राहुल व सचिव संजय चोथवे हे खिशातून खर्च भागवतात. त्यामुळे नवदाम्पत्यासह त्यांच्या परिवाराने गोसेवेसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. यावेळी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे संचालक विनायकराव शेळके, माजी संचालक आनंदराव शेळके, माजी उपसरपंच सजन सानप, विकास चकणे, बाजीराव शेळके, संपत सानप, भाऊसाहेब वाळके, रामदास सानप, विलास सानप आदींसह नातेवाईक मंडळी उपस्थित होते.

Web Title:  Goshala help by avoiding the cost of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.