आदिवासींच्या कौशल्याला वाव द्यावा : सूरज मांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:03 AM2019-07-18T00:03:25+5:302019-07-18T00:03:51+5:30

आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे.

 Give tribute to the skills of tribals | आदिवासींच्या कौशल्याला वाव द्यावा : सूरज मांढरे

आदिवासींच्या कौशल्याला वाव द्यावा : सूरज मांढरे

Next

नाशिक : आदिवासी बांधवांना वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी जवळून ओळखतात. त्यांच्यातील सुप्त कलागुणांची त्यांना जाणीव असते. वनविभागाने कारागृहाप्रमाणेच आदिवासींच्या कौशल्यविकासासाठी प्रयत्न करावे. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्स उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी केली.
पूर्व-पश्चिम वनविभागाच्या वतीने वनविश्रामगृहाच्या सभागृहात बुधवारी (दि.१७) संत तुकाराम वनग्राम योजनेचा जिल्हास्तरीय बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मांढरे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, शिवाजी फुले, तुषार चव्हाण उपस्थित होते. यावेळी मांढरे म्हणाले, बांबूच्या वस्तू विक्र ीसाठी वनविभागाने चांगले व्यासपीठ आदिवासींना उपलब्ध करून द्यावे. त्यासाठी वनमंत्रालयाच्या बांबू विकास मंडळाचे सहकार्य घ्यावे.
नाशिक पश्चिम विभागातील ननाशी वनपरिक्षेत्रातील गवळीपाडा (महाजे) येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. मान्यवरांच्या हस्ते समितीच्या पदाधिकाऱ्यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र यावेळी प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सहायक वनसंरक्षक सुजीत नेवसे, ननाशी परिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, त्र्यंबकेश्वरचे कैलास अहिरे यांसह तीनही गावांचे समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पूर्व विभागातील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील गोंदूने आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट पाड्याने वनसंवर्धनात अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. प्रास्ताविक फुले यांनी केले. सूत्रसंचालन सहायक वनसंरक्षक राजेंद्र मगदुम यांनी केले.
राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करा
वनसंवर्धनामध्ये आघाडी घेत गवळीपाड्याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच गोंदूने, श्रीघाट या गावांनी आपले स्थान राखले. गवळीपाडा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, या पाड्यावरील नागरिकांनी एकदिलाने वनविकास व संवर्धनासाठी अधिकाधिक प्रयत्न करावे जेणेकरून राज्यस्तरावरही प्रथम क्रमांक पटकाविता येईल. असे आवाहन यावेळी शिवाजी फुले यांनी केले.

Web Title:  Give tribute to the skills of tribals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.