नाशिकमध्ये तरुणीचे धाडस : चोरट्याने हिसकावलेली अडीच लाखांची बॅग पुन्हा परत मिळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:09 PM2018-03-15T16:09:51+5:302018-03-15T16:22:57+5:30

यावेळी तरुणीने हिम्मत करून दुचाकीने चोरट्याचा पाठलाग करत झटापट करून पैशांची बॅग परत ताब्यात घेतली; मात्र बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

The girl's stunt in Nashik: the thief got back the bag of two and a half million pieces | नाशिकमध्ये तरुणीचे धाडस : चोरट्याने हिसकावलेली अडीच लाखांची बॅग पुन्हा परत मिळविली

नाशिकमध्ये तरुणीचे धाडस : चोरट्याने हिसकावलेली अडीच लाखांची बॅग पुन्हा परत मिळविली

googlenewsNext
ठळक मुद्दे बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी वीस मिनिटांत दोन घटना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

नाशिक : द्वारकेकडून उपनगरच्या दिशेने मोपेड दुचाकीवरून तरुणी घरी जात असताना नासर्डी पुलालगत एका दुचाकीस्वार चोरट्याने २लाख ७० हजारांची रोकड असलेली बॅग मागे बसलेल्या तरुणीच्या आईच्या हातातून हिसकावली. यावेळी तरुणीने हिम्मत करून दुचाकीने चोरट्याचा पाठलाग करत झटापट करून पैशांची बॅग परत ताब्यात घेतली; मात्र बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका येथील एका बॅँकेतून पैसे काढून तक्षशिला चंद्रशेखर गायकवाड (२८) ही तरुणी आपल्या आईसोबत घराकडे मोपेड दुचाकीने (एमएच १५, एफआय ००६१) निघाली असता एका दुचाकीस्वार चोरट्याने पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केला. नासर्डी पुलाजवळ त्या आल्या असता, वळणावर चोरट्याने मागे बसलेल्या गायकवाड यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावली. दरम्यान, त्या खाली कोसळल्या. दुचाकी चालवत असलेली तरुणी तक्षशिला हिने स्वत:चा तोल सावरला आणि चोरट्याचा पाठलाग करून धाडसाने त्याच्या हातातील पैशांची बॅग पुन्हा ताब्यात घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्याच्या दुचाकीचा क्रमांक तरुणीला बघता आला नाही. नागरिकांची गर्दी जमू लागल्याने चोरट्याने दुचाकीवरून पळ काढला. हा थरार बुधवारी (दि.१४) दुपारी पाउण वाजेच्या सुमारास नागरिकांनी अनुभवला. पैशाची बॅग हिसकावल्यामुळे तक्षशिला यांच्या मातोश्री खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत तरुणीने आईला रुग्णालयात उपचारार्थ हलविले व घडलेला प्रकार मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन कथन केला. पोलिसांनी जबरी लुटीचा व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संशयित चोरट्याविरुद्ध दाखल केला आहे. एकूणच धाडसी तरुणीच्या प्रसंगावधानामुळे रोकड सुरक्षित राहिली. तरुणीने न घाबरता चोरट्याचा पाठलाग करून चालत्या दुचाकीवरूनच झटापट करत पैशाची बॅग पुन्हा ताब्यात घेतली. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
---
वीस मिनिटांत दोन घटना
नासर्डी पुलालगत जबरी चोरीचा दुचाकीस्वाराकडून झालेला हा प्रयत्न धाडसी तरुणीने हाणून पाडला. ही घटना १२ वाजून ४० मिनिटाला घडली. सुमारे वीस मिनिटे उलटत नाही तोच पुन्हा या घटनास्थळापासून बोधलेनगरच्या जवळपास मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका दुचाकीस्वाराने चारचाकीस्वाराला अडवून मारहाण करत गळ्यातील ५० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.


 

Web Title: The girl's stunt in Nashik: the thief got back the bag of two and a half million pieces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.