पाकमधूून परतलेली ‘गीता’ ही माझी ‘गुड्डीच’

By vijay.more | Published: February 26, 2018 01:48 AM2018-02-26T01:48:51+5:302018-02-26T01:48:51+5:30

एक मूकबधिर चिमुकली भारतात चुकून राहते आणि तिला तिच्या मूळ घरी म्हणजे पाकिस्तानात पोहोचविण्यासाठी बजरंगी भाईजान शत्रुराष्टÑात शिरण्याचे धाडस करतो आणि त्यात यशस्वीही होतो. या चित्रपटातील नेमका उलट प्रवास झालेली मूळ भारतीय, परंतु पाकिस्तानात गेलेल्या गीताचे प्रकरण देशभर गाजले आणि तिला पुन्हा भारतात आणले खरे, परंतु तिच्या पालकत्वावरून अनेक दावे आणि प्रतिदावे झाले. त्यात आता नाशिक जिल्ह्यातील असलेल्या आणखी एका पित्याची भर पडली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जन्मलेली आणि जन्मत:च मूकबधिर असलेली ती गीता म्हणजे आपलीच मुलगी असल्याचा दावा दिंडोरी तालुक्यातील रमेश सोळसे यांनी केला आहे.

The 'Gidda', which has returned from the ground, is my 'Guddich' | पाकमधूून परतलेली ‘गीता’ ही माझी ‘गुड्डीच’

पाकमधूून परतलेली ‘गीता’ ही माझी ‘गुड्डीच’

Next

नाशिक : एक मूकबधिर चिमुकली भारतात चुकून राहते आणि तिला तिच्या मूळ घरी म्हणजे पाकिस्तानात पोहोचविण्यासाठी बजरंगी भाईजान शत्रुराष्टÑात शिरण्याचे धाडस करतो आणि त्यात यशस्वीही होतो. या चित्रपटातील नेमका उलट प्रवास झालेली मूळ भारतीय, परंतु पाकिस्तानात गेलेल्या गीताचे प्रकरण देशभर गाजले आणि तिला पुन्हा भारतात आणले खरे, परंतु तिच्या पालकत्वावरून अनेक दावे आणि प्रतिदावे झाले. त्यात आता नाशिक जिल्ह्यातील असलेल्या आणखी एका पित्याची भर पडली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जन्मलेली आणि जन्मत:च मूकबधिर असलेली ती गीता म्हणजे आपलीच मुलगी असल्याचा दावा दिंडोरी तालुक्यातील रमेश सोळसे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या बालिकेची डीएनए टेस्ट केल्यास आपले पितृत्व सिद्ध होईल, असा त्यांचा दावा असून त्यासाठी सरकारपर्यंत प्रयत्न करणाºया सोळसे सध्या दिल्लीत जाण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरे झिजवित आहेत.  बजरंगी भाईजान जितका रंजक, त्याच पद्धतीची ही घटना असल्याचे सोळसे यांचे म्हणणे आहे. सुमारे दीड दशकापूर्वी रेल्वेने चुकून पाकिस्तानात गेलेली व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नातून भारतात परतलेली ‘गीता’ ही आपली मुलगी गुड्डी असल्याचा दावा करणारे रमेश सोळसे हे दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील रहिवासी आहेत़ सोळसे यांनी टीव्हीवरील गीताच्या बातम्या बघितल्यानंतर त्यांना अठरा वर्षांपूर्वी नाशिकमधून परागंदा झालेली ही मूकबधिर गीता आपलीच कन्या असल्याचे त्यांना मनोमन पटले. (पान २ वर)


या मुलीने साकारलेला घराचा नकाशा हा एकलहरा येथील त्या मुलीच्या आजोळचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्थात, अत्यंत सामान्य असलेल्या सोळसे यांच्याकडे त्यांच्या कन्येच्या जन्मासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रे कोणतीच नव्हती. त्यामुळे गीताकडे जशजशी त्यांची ओढ वाढत गेली. तस तसे त्यांनी कागदपत्रांची जुळवाजूळव सुरू केली. गेल्या तीन वर्षांपासून म्हणजेच २०१५ पासून ते कागदपत्रे जमवित होते़ कागदपत्रे जमविल्यानंतर आता गीता ही आपली मुलगी गुड्डीच असल्याने याप्रकरणात मदत करण्यासाठी त्यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची भेट घेऊन साकडे घातले आहे़ गीता आपलीच मुलगी आहे, हे सिद्ध करण्यासाठी दिल्लीतील डॉक्टरांना भेटून डीएनए चाचणीसाठी तयारी असल्याचे सोळसे यांनी सांगितले़ नाशिकच्या सोळसे यांची गीता ही कन्या कशी काय असू शकते, याबाबत त्यांनी काही घटनाक्रमही मांडला आहे.  २०००-२००१ साली आपली चार वर्षांची मूकबधिर मुलगी गुड्डी ही पत्नी आशा, तिचे आजोबा निवृत्ती आव्हाड व आजी यांच्यासमवेत रेल्वेने मुंबईला गेली होती़ मुंबईहून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर परतल्यानंतर गुड्डी हरवली़ त्यावेळी सुरू असलेल्या समझौता एक्स्प्रसेद्वारे ती पाकिस्तानला गेली़ रेल्वे पोलिसांकडे मुलगी हरविल्याची तक्रार करण्यासाठी गेलो असता त्यांनी सापडली तर कळवितो असे सांगितले व तक्रारीची नोंद केली नाही़ सोलापूरला सिद्धेश्वर दूध डेअरीमध्ये कामास असलेले सोळसे यांनी त्यानंतर मुलीच्या शोधासाठी अनेक अनाथाश्रम तसेच विविध ठिकाणी पालथी घातली मात्र ती सापडली नाही़, तर पत्नी आशासोबतच्या झालेल्या वादानंतर त्यांनी एकमेकांची साथ सोडली व कालांतराने दोघांनीही दुसरा घरोबा केला़ परंतु गुड्डीला विसरू शकले नाही. नाशिकच्या
जिल्हा रुग्णालयात सातव्या महिन्यात जन्मास आलेल्या गुड्डीला बोलता येत नव्हते़ तसेच तिचे हरविण्यापूर्वीचे बालपण हे एकलहरा परिसरात गेले असून, या ठिकाणचे फोटो दाखविल्यास ती तत्काळ ते ओळखेल़ तसेच तिने घराचा नकाशा तसेच घरात सहा माणसे असल्याचे सांगितले होते़ तिच्या आजीला पाहताच ती तत्काळ ओळखेल असे सोळसे सांगतात़ २०१५ मध्ये टीव्हीवरून गीताची माहिती मिळाली, तेव्हापासून ते पुरावे शोधत होतो़ मात्र, मुलीची जन्मतारीख माहिती नव्हती तर केवळ मंगळवार व दत्तजयंती व जिल्हा रुग्णालयात जन्म इतकेच आठवत होते़ त्यामुळे गंगाघाटावरील एका पुरोहिताकडे जाऊन दत्तजयंती व मंगळवार ही तारीख पंचांग तसेच कालदर्शिकेत शोधली असता ती दि. २४ डिसेंबर १९९६ असल्याचे समोर आले़, असा त्यांचा दावा आहे. मुलीच्या जन्माच्या दाखल्यासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही महापालिका कार्यालयात त्यांनी अनेक चकरा मारल्या. त्यासंदर्भातील रेकॉर्ड सापडत नव्हते़ अखेर मेनरोड विभागीय कार्यालयात मुलीच्या जन्माची नोंद सापडल्यानंतर त्यांनी दाखला मिळवला आहे़ खासदार चव्हाण यांची सोळसे यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीतील डॉक्टर संदीप पवार यांच्याशी फोनद्वारे बोलणे करून दिले असून, त्यांनी डीएनए चाचणीसाठी दिल्लीला बोलावले आहे़ मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची, कमी शिक्षण दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाबाबत काही माहिती नसल्याने ते मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवताहेत़ मात्र, अधिकारीवर्ग त्यांना भेट देत नाही़ त्यामुळे दिल्लीत डीएनएसाठी कसे जायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे़
गीताची घरवापसी देशपातळीवर गाजलेले प्रकरण आहे. आतापर्यंत देशातील अनेक कुटुंबांनी गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा केला असला तरी ते सिद्ध करू शकलेले नाही़ मात्र सोळसे हे डीएनए चाचणीसाठी तयार असून, गीता ही आपलीच मुलगी असून, ती आपल्याला ओळखेलच असा त्यांचा दावा आहे़ त्यामुळे कदाचित गीता ही सोळसे यांची मुलगी असल्याची शक्यता नाकारता येत नाही़ या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने सोळसे यांना मदत करण्याची आवश्यकता आहे़
‘गीता’ची कहाणी़़़
गीता नावाची एक मूकबधिर भारतीय मुलगी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी रेल्वेमधून चुकीने पाकिस्तानात गेली होती़ तेव्हा पाकिस्तान पंजाब फ्रंटियर जवानांच्या हाती ही मुलगी लागल्यानंतर तिची विचारणा केली असता ती मूकबधिर असल्याच्या त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी या मुलीला लाहोरमधील एदी फाउंंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वाधीन केले़ या संस्थेचे प्रमुख फैसल एदी यांनी या मुलीला वेगवेगळ्या पद्धतीने तिच्या कुटुंबीयांविषयी विचारणा केली, मात्र तिच्या हावभावांवरून काहीच न उमगल्याने तिची रवानगी कराचीमधील एदी फाउंडेशनच्या आश्रयगृहात करण्यात आली़  कराचीतील मदर आॅफ पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाणाºया बिल्किस एदी यांनी मुलीची विचारपूस केली असता तिने भारताच्या नकाशाकडे बोट दाखविले़ यानंतर बिल्किस यांनी तिचे नामकरण ‘गीता’ असे केले़ तेव्हापासून गीता एदी फाउंंडेशनमध्ये होती व संस्था तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत होती़ दरम्यान, सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणात लक्ष घातले व पाकिस्तानातील भारतीय दुतावासाद्वारे गीताला पुन्हा भारतात आणले़
डीएनए चाचणीनंतरच ‘गीता’चा ताबा
सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटानंतर सुमारे दीड दशकापूर्वी रेल्वेने पाकिस्तानात गेलेल्या ‘गीता’या मूकबधिर मुलीची माहिती समोर आली़ २०१५ मध्ये वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये आलेल्या बातम्यांनंतर बिहारमधील महतो तसेच देशातील विविध ठिकाणांहून गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा करण्यात आला होता़ मात्र, त्यांना ओळखण्यास गीताने नकार दिला होता़ त्यामुळे डीएनए चाचणी हा गीताच्या कुटुंबीयांना शोधण्याचा एकमेव आधार असून डीएनए मॅच होणाºया कुटुंबाकडेच गीताला सोपविले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे़

Web Title: The 'Gidda', which has returned from the ground, is my 'Guddich'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक