रामशेजच्या पायथ्याशी भरला साहित्यिकांचा मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 07:08 PM2019-06-05T19:08:32+5:302019-06-05T19:11:59+5:30

पेठ : रामशेज शिक्षण संस्था व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणाऱ्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यस्तरीय साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.

A gathering of artists full of Ramshej | रामशेजच्या पायथ्याशी भरला साहित्यिकांचा मेळा

जीवनगौरव मासिकाचे प्रकाशन करतांना उत्तम कांबळे, शिवराम बोडके, रामदास वाघमारे, रूपाली बोडके, वैशाली भामरे आदी.

Next
ठळक मुद्देसाहित्य, कवी संमेलन : जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या विचाराने श्रोते प्रेरीत

पेठ : रामशेज शिक्षण संस्था व जीवन गौरव महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहासाची साक्ष देणाऱ्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी राज्यस्तरीय साहित्य व कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे यांनी संमेलनाध्यक्षपद भुषवले. सकाळी ग्रंथदिंडीने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. स्वागताध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष शिवराम बोडके यांनी प्रास्ताविक केले. संपादक रामदास वाघमारे यांनी जीवन गौरवचा साहित्य क्षेत्रातील लेखाजोखा सादर केला. संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्व विषेध करतांना विविध उदाहरणासह यशस्वी जीवनाचा साहित्य हा भक्कम पाया असल्याचे प्रतिपादन केले.
सद्याची शिक्षण पध्दती मुलांना वर्तमानकाळाचे शिक्षण देण्यास असमर्थ असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र लाखे, नगरसेवक कमलेश बोडके, किशोर दराडे, माजी विद्यार्थीनी कविता बोडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांना समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुमारच्या सत्रातील कवी संमेलनात राज्यातील विविध भागातून आलेल्या कवींनी कविता सादर केल्या. रामशेज शिक्षण संस्थेतील विविध क्षेत्रातील गुणवंत शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षण तज्ञ भाऊसाहेब चासकर, प्राचार्य डी.डी. सुर्यवंशी, संपादक डी.बी. शिंदे, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, जीवन गौरव मासिक चे संपादक रामदास वाघमारे,आयोजक रूपाली बोडके, वैशाली भामरे,सरपंच जिजाबाई तांदळे,मोहन बोडके
कचेश्वर बोडके,संजय बोडके, नगरसेवक कमलेश बोडके, फुलावती बोडके, वंदना सलबदे, नंदीनी बोडके, शाम बोडके, मनिषा बोडके, चेअरमन दशरथ बोडके यांचेसह राज्यातील साहित्यिक, कवी, शिक्षक , जीवन गौरवचे सहसंपादक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा.सतिश म्हस्के यांनी सुत्रसंचलन केले.

 

Web Title: A gathering of artists full of Ramshej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक