गॅस गळतीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:44 PM2018-10-11T23:44:47+5:302018-10-12T00:17:09+5:30

नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे समजल्यानंतर दोन्ही बाजूने थोपवून धरलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Gas leakage | गॅस गळतीची रंगीत तालीम

गॅस गळतीची रंगीत तालीम

Next
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन : यंत्रणांच्या समन्वयाची पडताळणी

सातपूर : नाशिक-पुणे हायवेवरील शिंदे-पळसे टोलनाक्याजवळ गॅस भरलेल्या टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झालेली धावपळ.. गॅस गळती थांबविण्यासाठी सिन्नर आणि परिसरातून सायरन वाजवत आलेली आपत्कालीन यंत्रणा... त्यानंतर हे मॉकड्रिल (रंगीततालीम) असल्याचे समजल्यानंतर दोन्ही बाजूने थोपवून धरलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जागतिक आपत्ती निवारण सप्ताहानिमित्ताने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. शिंदे, पळसे गावाजवळील टोलनाक्यावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस भरलेल्या टँकरमधून गॅसगळती झाल्यानंतर आपत्कालीन व्यवस्था किती वेळेत पोहोचते आणि काय काय उपाययोजना केली जाते याचे निरीक्षण आणि नोंद घेण्यात आली. निरीक्षक म्हणून बॉश कंपनीचे पी. आय. शर्मा, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीचे सचिन मोरे, मनोज पाटील, वामन कराळे, विकास दंडवते आदींनी काम पाहिले.
यावेळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक देवीदास गोरे, उपायुक्त डी. आर. खिरोडकर, व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे, नायब तहसीलदार शेवाळे, डॉ. किरण मोघे, के. टी. झोपे, विलास बिडवे, मार्गचे अध्यक्ष नोबर्ट डिसूझा, पी. आर. घोलप, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मॉकड्रिलदरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक व्यवस्था थोपवून धरली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मॉकड्रिल संपल्यानंतर निरीक्षकांनी केलेल्या निरीक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. त्यात कोणी आणि कशी भूमिका बजावली, कुठे चूक झाली आणि भविष्यात असा प्रसंग निर्माण झालाच तर अजून काय सुधारणा केली पाहिजे, हे निरीक्षकांनी सांगितले.

Web Title: Gas leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.