नाशिकमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:22 PM2018-09-23T16:22:41+5:302018-09-23T16:23:03+5:30

Ganpati Visarjan Celebration in Nashik | नाशिकमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

नाशिकमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

Next

- अझहर शेख

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली. ती केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा च्या वादनात बाप्पाची मिरवणुकीला दुपारी बारा वाजता सुरुवात करण्यात आली. प्रारंभी नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम क्रमांकावर होता या मिरवणुकीत सुमारे 21 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. सर्वच गणेश मंडळांनी डीजे वापरावर बंदी घातली याऐवजी नाशिकचा प्रसिद्ध ढोल ला पसंती दिली. त्यामुळे शहरातील सगळ्याच ढोल पथकाला रोजगार रोजगारही मिळाला पारंपारिक पोषाखात तरुण-तरुणी कमरेला ढोल-ताशा बांधून वाजत गाजत बाप्पाला निरोप देत होते. यावेळी काही पथकांमधील सदस्यांनी ध्वजकरीची भूमिका पार पडली हातात उंचच उंच भगवे ध्वज घेऊन हे ध्वजकरी ढोल ताशांच्या तालावर थिरकत होते.  मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे.  दुपारी सव्वा बारा वाजता मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन,  महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, स्वामी संविदानंद सरस्वती, भक्तीचरणदास महाराज, गजानन शेलार, विनायक पांडे, समीर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक फाळके रोड येथून सुरू झाली. दूध बाजार, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, रेडक्रॉस सिग्नलमार्गे रविवार कारंजा, अहळ्यादेवी होळकर पूल वरून मालेगाव स्टँड वरून पंचवटी कारंजा, म्हसोबा पटांगण गोदकाठावर पोहचणार आहे. यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक ढोल पथक मुख्य आकर्षण ठरत आहेत. सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रा मंडळाचा नाशिकचा राजा, सत्यम मित्रमंडळाच्या मानाचा राजा या दोन गणरायाच्या मुर्ती सुमारे वीस फुटी आहेत. मुंबई नाका युवक मित्र मंडळाने कालियाना मर्दनचा आकर्षक पुष्प सजावट करून त्यात बाप्पाला विराजमान केले होते. तसेच रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्ग 50 सीसीटीव्ही केमेऱ्यांच्या नजरेत होता. तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', 'मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया,' 'अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला', ' असा जयघोष करत बापाला भावपूर्ण निरोप दिला. 
दरम्यान, घरगुती मंडळांनी देखील बाप्पाला उत्साहात निरोप दिला, यावेळी गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करत नाशिककरांनी 'वुई विल डू नो पोलूशन, इको फ्रेंडली गणपती सोल्युशन' असा संदेश देत गोदमायचे प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला. यावेळी तपोवन, गंगापूर रोड, नासर्दी पूल आदी ठिकाणी महापालिका प्रशासनाने निर्माल्य कलश ठेवत कृत्रिम तलाव उभारले होते. नागरिकांनी या तलावात बाप्पाचे विसर्जन करत मूर्ती दान केले. मूर्ती संकलन करण्यासाठी विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेतला होता.

Web Title: Ganpati Visarjan Celebration in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.