ओझरऐवजी गांधीनगर... प्रवासी फिरले गरगर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:33 AM2018-06-16T00:33:01+5:302018-06-16T00:33:40+5:30

 Gandhinagar instead of Ojhar ... traveler feral gargar! | ओझरऐवजी गांधीनगर... प्रवासी फिरले गरगर!

ओझरऐवजी गांधीनगर... प्रवासी फिरले गरगर!

googlenewsNext

नाशिक : ओझर येथे एचएएलच्या मालकीच्या विमानतळावरून नाशिक-दिल्ली सेवा सुरू झाली, परंतु जेट एअरवेज कंपनीने तिकिटांवर गांधीनगर असा  उल्लेख केल्याने यासंदर्भात माहिती नसलेले काही प्रवासी  भरकटले. दिल्लीतील एक प्रवासी तर तब्बल ११ वाजेपासून गांधीनगर येथे शिरकावासाठी प्रयत्न करीत होते. अखेरीस कंपनीच्या हेल्पलाइनच्या माहितीवरून सव्वा वाजता कसेबसे विमानतळावर पोहोचले.  नाशिकहून प्रलंबित विमानसेवा सुरू होत असल्याने एकीकडे  सर्वांनी स्वागत केले असताना, दुसरीकडे मात्र हा भलताचप्रकार घडला. नाशिकमधील व्यावसायिक पारस लोहाडे  आणि दिल्ली येथील अभियंता गौरव शर्मा यांच्या बाबतीत हा प्रकार घडला.दिल्ली येथील रहिवासी असलेले गौरव शर्मा नाशिकमध्ये कामानिमित्ताने आले होते. त्यांचे काम संपल्याने त्यांनी दिल्लीला परत जाण्यासाठी नाशिक ते दिल्ली या जेट एअरवेजच्या विमानसेवेचे तिकीट काढले होते. त्यावर गांधीनगर विमानतळाचा उल्लेख होताच; शिवाय गो थ्रु गुगल मॅप असा गुगलचा आधार घेण्याचे नमूद करण्यात आले होते.  नाशिकविषयी पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी गुगल मॅपद्वारे गांधीनगर गाठले, तेव्हा हा लष्करी भाग असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आणि दुसऱ्या गेटकडे जाण्यास सांगण्यातआले.  अशाप्रकारे चार गेट फिरल्यानंतर वैतागून त्यांनी कंपनीच्या हेल्पलाइनवर फोन  केला तेव्हा ओझर विमानतळाचा उलगडा झाला. त्यानंतर धापवळ करीत त्यांनी ओझर विमानतळ गाठले.  नाशिकचे जैन समाजाचे कार्यकर्ते पारस लोहाडे यांच्या बाबतही असाच प्रकार घडला. त्यांनीदेखील धावपळ करीत हे विमानतळ गाठले.  नाशिकमधील विमानसेवा सुरू झाल्याने विकास होणार असल्याच्या अनेक कल्पना बोलूनदाखविल्या जात असल्या, तरी विमानतळ गाठण्यासाठी प्रवाशांना अत्यंत कठीण प्रवास करावा लागत आहे. विशेषत: महामार्गाकडून विमानतळाकडे जाणाºया रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सदरचे काम गेल्या वर्षीपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे.  याशिवाय महामार्गावर आणि जानोरीकडे वळतानाही तेथे विमानतळाकडे जाणारे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नाशिकची माहिती नसलेल्या प्रवाशांचे हाल होतात. ओझर विमानतळावर जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी कोणतीही प्रवासी वाहतुकीची सोय नसल्याने त्याविषयीदेखील अनेकांनी भावना व्यक्त केल्या. विमानतळावरदेखील कॅफेटेरिया नाही.
आता त्यात सुधारणा व्हाव्यात, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. 
विमान कंपनीने तिकिटावर गांधीनगर विमानतळ असा उल्ेख करून गुगल मॅपची मदत घेण्यास सांगितल्याने गोंधळ निर्माण झाला. मी सकाळी ११ वाजेपासून फिरत होतो. नंतर हेल्पलाइनला कळविल्यानंतर त्यांनी ओझर विमानतळाचा पत्ता दिला. परंतु तेथे जाताना कोठेही दिशादर्शक फलक नव्हते त्यामुळे खूप अडचण झाली. मी सव्वा वाजता धावपळ करीत विमानतळावर पोहोचलो.
- गौरव शर्मा, अभियंता, दिल्ली
विमानसेवा सुरू झाल्याने प्रवाशांच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. विमानतळावर जाण्यासाठी किंवा परतण्यासाठी खासगी प्रवासी कंपनीची सेवा देण्याबाबत बोलणे चालू आहे. विमानतळाकडे येणाºया मार्गाचे भूसंपादन पूर्ण होत आल्याने आता रस्त्याच्या कामाला गती येईल. त्याचप्रमाणे या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार असून, टर्मिनल बिल्डिंगमध्ये कॅफेटेरियाही सुरू करण्यात येणार आहे.

Web Title:  Gandhinagar instead of Ojhar ... traveler feral gargar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.