गिरणारे येथे गजानन महाराज पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:55 AM2018-09-18T00:55:37+5:302018-09-18T00:56:19+5:30

गिरणारे येथे संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक काढून भजन व कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते.

 Gajananan Maharaj Punyathithi at Girnar | गिरणारे येथे गजानन महाराज पुण्यतिथी

गिरणारे येथे गजानन महाराज पुण्यतिथी

googlenewsNext

गंगापूर : गिरणारे येथे संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त मिरवणूक काढून भजन व कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रा. संदीप महाराज रायते म्हणाले की, संतांचे विचारच सामाजिक परिवर्तनाची एकमेव गरज आहे, ती आचरणात आली पाहिजे, सार्वजनिक, सामाजिक, राजकीय अस्थिरतेला आता स्थिर करण्याची जबाबदारी येथील संवेदनशील जागृत व्यक्तींची आहे, असेही प्रा. संदीप महाराज रायते यांनी सांगितले. गिरणारे येथे संत गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कीर्तन निरुपणाप्रसंगी ते बोलत होते. संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. या दिंडीत गावातील वारकऱ्यांनी भजन गात गावातून ही मिरवणूक काढली. यावेळी भाविक भक्त ग्रामस्थांनी दर्शन घेतले. सायंकाळी बारभाई विठ्ठल मंदिरात महाप्रसाद झाल्यानंतर रात्री गावातील हनुमान मंदिरात प्रा.संदीप महाराज रायते यांचे कीर्तन निरूपण झाले.  याप्रसंगी माणिकराव देशमुख, आप्पासाहेब शिंदे, जगन्नाथ कुरणे, सुकदेव ढिकले, भाऊराव मगर, गायनाचार्य दांडेकर, प्रा.सोमनाथ घुले, चव्हाण, भौराज थेटे, नवनाथ महाराज थेटे, भीमाजी थेटे, संपतराव थेटे, बाबासाहेब थेटे, गोकुळ थेटे यांसह अनेक वारकरी भाविक उपस्थित होते.

Web Title:  Gajananan Maharaj Punyathithi at Girnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.