कर कपातीनंतरही इंधनदरवाढ सुरुच ; नाशकात पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:11 PM2018-10-06T16:11:54+5:302018-10-06T16:13:25+5:30

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिममुळे शनिवारी (दि.६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेच्या किंमती वाढल्या असून रोज वाढणाऱ्या इंधनांच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.  

Fuel increases after tax hikes; Petrol in Nashik 87.60 and diesel 76.02 | कर कपातीनंतरही इंधनदरवाढ सुरुच ; नाशकात पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपये

कर कपातीनंतरही इंधनदरवाढ सुरुच ; नाशकात पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपये

Next
ठळक मुद्देकर कपातीनंतर इंधनााची दरवाढ नाशिकमध्ये पेट्रोल ८७.६० तर डिझेल ७६.०२ रुपयेदरवाढीमुळे करकपातीचा अत्यल्प फायदा

नाशिक : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिममुळे शनिवारी (दि.६) पुन्हा पेट्रोल आणि डिझेच्या किंमती वाढल्या असून रोज वाढणाऱ्या इंधनांच्या दरापुढे केंद्र व राज्य सरकारचा करकपातीचा प्रयत्नही थिटा पडला आहे.  
केंद्र सरकारने गेल्यावर्षी १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीत रोजच्या रोज होणाऱ्या बदलांमुळे इंधनाच्या दरात हळूहळू वाढ होऊन पेट्रोलचे दर ९१.७९ रुपयांपर्यंत तर डिझेलचे दर ७९.३१ रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यात केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात केली आहे. परंतु, शनिवारी पेट्रोल १८ पैशांनी महागले असून डिझेल ६९ पैशांनी महागलल्याने सरकारचे कर कपात करून इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न थिटे पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये इंधन दरवाढीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून केंद्र सरकाने रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिममध्येच कायमस्वरुपी बदल करण्यासोबतच पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून होत आहे.

दरवाढीमुळे करकपातीचा अत्यल्प फायदा 
सरकारने केलेल्या करकपातीनंतर शुक्रवारी पेट्रोल ८७.४२ रुपये तर डिझेल ७६.७० रुपये असलेल्या दरांमध्ये शनिवारी पुन्हा वाढ होऊन पेट्रोल ८७.६० तर  डिझेल ७६.०२ रुपयांनी विकले गेले. या दरवाढीमुळे राज्य सरकारने करामध्ये दीड रुपया कपात करूनही नाशिकरांना शनिवारी डिझेलच्या दरात केवळ ६८ पैसे दर कपातीचा फायदा मिळाला. त्यामुळे एककडे सरकार इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करीत असले तरी दुसरीकडे रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमुळे दरवाढ सुरूच असल्याने ग्राहकांना करकपातीचा अत्यल्प फायदा मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

Web Title: Fuel increases after tax hikes; Petrol in Nashik 87.60 and diesel 76.02

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.