बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 01:39 AM2019-07-15T01:39:40+5:302019-07-15T01:40:00+5:30

जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. त्यामुळे पेरणीला वेग आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे खरेदी करताना दिसून येत आहे. परंतु बाजारात बोगस बियाणे आले असून, शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

Fraudulent fraud by bogass seeds | बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

Next
ठळक मुद्देपेरणीसाठी बियाण्यांची वाढती मागणी; तालुक्यात शेतीच्या कामांना वेग

नाशिक : जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. त्यामुळे पेरणीला वेग आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर बियाणे खरेदी करताना दिसून येत आहे. परंतु बाजारात बोगस बियाणे आले असून, शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
या काळात शेतीला लागणाºया बी-बियाणे याला अधिक मागणी असते. परंतु बियाणे घेताना क ाळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हल्ली बोगस बियाणे कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून, या कंपन्यांपासून शेतकºयांनी सावध राहणे गरजेचे आहे. सदर कंपन्यांना कोणताही परवाना नसताना बियाणे विक्री करताना दिसून येतात, अशा बोगस कंपन्यांकडील बियाणे योग्य त्या पात्रतेचे नसल्याने जमिनीची उत्पादन क्षमता खालावते. त्यामुळे अशा दुकानदारांनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांना शेतकºयांनी बळी पडू नये.
ग्रामीण भागातील शेतकरी बियाणे घेताना दुकानदारांकडून पक्के बिल न घेता साध्या कागदावरील बिल घेतात. यामुळे खासगी कंपन्या दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर सूट देतात. काही जण छापील किमतीपेक्षा कमी दरात बियाणे उपलब्ध करून देतात. यामध्ये शेतकरी व शासनाची लूट होते. पक्के बिल नसल्यामुळे दुकानदाराला जाब विचारता येत नाही. अशावेळी बिलाची मूळ प्रत आणि बियाण्यांची पिशवी आवश्यक ठरते. त्यामुळे शक्यतो मूळ बिलाची मागणी दुकानदाराक डे करायला हवी.
बियाणे खरेदी करताना घ्या काळजी..
बियाण्यांच्या पाकिटावरील बियाणे वापरण्याची अंतिम मुदत व किंमत तपासून घेतली पाहिजे, तसेच बियाणे खरेदी करताना सीलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करावी. महत्त्वाचे म्हणजे अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे व खरेदीची पक्की पावती मागून घ्यावी. बियाणे पिशवी, खरेदीची पावती व थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.
फसवणूक झाल्यास काय करावे
बियाणांबाबत फसवणूक झाल्यास शेतकरी जिल्हास्तरीय ग्राहक मंच, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Fraudulent fraud by bogass seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.