साडेचार लाखांची फसवणूक : परप्रांतीय भाडेकरूचा प्रताप १४ किलो चांदीच्या भांड्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:52 AM2018-01-13T00:52:35+5:302018-01-13T00:53:38+5:30

नाशिक : विनायक अपार्टमेंटमधील परप्रांतीय भामट्याने ओळखीचा गैरफायदा घेऊन राजस्थान येथील व्यावसायिकाच्या ४ लाख ५० हजाराच्या चांदीच्या भांड्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Fourteenth Deceased Cheating: Pratapanti Tenant Pratap Pratap Nine Kg Silver Vendors | साडेचार लाखांची फसवणूक : परप्रांतीय भाडेकरूचा प्रताप १४ किलो चांदीच्या भांड्यांवर डल्ला

साडेचार लाखांची फसवणूक : परप्रांतीय भाडेकरूचा प्रताप १४ किलो चांदीच्या भांड्यांवर डल्ला

Next
ठळक मुद्देचांदीच्या भांड्यांच्या विक्रीचा व्यवसायचोरीचा गुन्हा दाखल

नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील विक्रीकर भवनच्या भागातील विनायक अपार्टमेंटमधील सदनिकेत भाडेतत्त्वावर राहणाºया एका परप्रांतीय भामट्याने ओळखीचा गैरफायदा घेऊन राजस्थान येथील व्यावसायिकाच्या ४ लाख ५० हजाराच्या चांदीच्या भांड्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुकेश तेजाराम माली ऊर्फ मिठालाल माली (३३ रा. पाडीव, जि. सिरोही, राजस्थान) यांचा चांदीच्या तयार भांड्यांच्या विक्रीचा व्यवसाय आहे. ते आंध्र प्रदेश राज्यात व्यवसाय करतात. त्यांच्याकडे कामाला असलेल्या कपिल नावाच्या व्यक्तीद्वारे त्यांची प्रकाशसोबत ओळख झाली. आंध्र प्रदेश येथून नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रकाशच्या राहत्या घरी विनायक अपार्टमेंटमधील सदनिकेत १४ किलो भांड्यांची पिशवी ठेवून प्रकाशसोबत डिसेंबरच्या ४ तारखेला राजस्थान गाठले. राजस्थानला पोहचल्यानंतर दहा ते बारा दिवस तेथे राहिल्यानंतर पुन्हा ते व्यवसायासाठी नाशिकला येण्यास निघाले असता प्रकाशने माली यांच्यासोबत येण्यास नकार देत तुमचे भांडे हे तेथील एका दुकानामध्ये आहे, असे सांगितले. माली हे नाशिकला आले असता सदर दुकानदाराकडे विचारणा केली तर त्याने तसे काहीही आमच्याकडे त्याने ठेवलेले नाही, असे सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माली यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून संशयित प्रकाश फाऊलाल देवाक्षी (पामेरा गाव, जि. सिरोही, राजस्थान) विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोडके करीत आहे.

Web Title: Fourteenth Deceased Cheating: Pratapanti Tenant Pratap Pratap Nine Kg Silver Vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा