दोडी शिवारात चार  ट्रकचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:22 PM2017-11-26T23:22:15+5:302017-11-27T00:34:05+5:30

Four truck fatal accidents in Dodi Shivar | दोडी शिवारात चार  ट्रकचा भीषण अपघात

दोडी शिवारात चार  ट्रकचा भीषण अपघात

Next

नांदूरशिंगोटे : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दोडी शिवारात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास  चार मालट्रकचा विचित्र भीषण अपघात झाला. यात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी  रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.  वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.  मनोज पांचाळ, रा. गुजरात  व मनोज चव्हाण अशी अपघातातील जखमींची नावे असून, अन्य  तिघांची ओळख पटू शकलेली  नाही.
रविवारी (दि.२६) संगमनेरकडून नाशिककडे पुठ्ठे घेऊन जाणारा ट्रक (एमएच १४ ईएम ९३४७) दोडी बुदू्रक शिवारात हॉटेल गायत्रीसमोर उलटला. सदरचा मालट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने नाशिक-पुणे रस्त्यावरची वाहतूक नांदूरशिंगोटे बायपासपासून एकेरी करण्यात आली होती.  त्यानंतर दोडी खुर्द शिवारातील फाट्यावर सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिन्नरकडून संगमनेरच्या दिशेने मोटारीचे मटेरिअल घेऊन जाणारा दहाचाकी मालट्रक (क्र. जीजे ३ एटी ४६५४) व समोरून येणारा ट्रक (क्र. एमएच १७ एजे ९९५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली.
यावेळी मागून येणारा उसाची वाहतूक करणारा आयशर ट्रक (जीजे ०८ वाय ७३६०) या अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. याच वेळी संगमनेरकडून सिन्नरकडे येणारा भरधाव ट्रक (क्र. एमएच १७ एजी ९९५७) या ट्रकवर जाऊन आदळला. तसेच ट्रक (क्र . एमएच १५ एजी ३७९८) हा सुध्दा जाऊन धडकला. असा हा विचित्र अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले त्यांना नाशिक व संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेतली.  या विचित्र अपघातांमुळे राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प होती. नंतर एकरी वाहतूक सुरू करण्यात आली. वावी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. के. अंढागळे हे करीत आहे. अन्य दोन जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाही. 
अपघातात ३ ट्रक रस्त्यावर उलटल्या. अपघात इतका भयानक होता की ट्रकचा चक्काचुर झाला. जखमींना बाहेर काढताना अडचण निर्माण झाली होती. यावेळी वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, तीन क्र ेन व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातात तीन चालक व दोन किल्नर गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी नाशिक व संगमनेर येथे खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Four truck fatal accidents in Dodi Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.