नाशिकमध्ये घरफोडीत सोन्याची सात बिस्कीटे अन् पाच किलो चांदी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, November 09, 2017 4:39pm

गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणा-या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या मालकीचे सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद

नाशिक : येथील गोविंदनगर परिसरातील एका  घरफोडीमध्ये सुमारे चौदा लाखांचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोविंदनगर पसिरातील चाणक्य बंगल्यामध्ये राहणा-या प्रतिभा प्रकाश चांडक (५८) यांच्या मालकीचे सुमारे चौदा लाखांचे दागिने संशयित नितीन यादव वालझाडे याने लंपास केल्याची फिर्याद चांडक यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी संशयिताविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे. अद्याप पोलिसांना यादव हा मिळून आलेला नाही. चोरी गेलेल्या दागिण्यांमध्ये १००ग्रॅमचे तीन व ५०ग्रॅमचे चार सोन्याची बिस्कीटे असा एकूण आठ लाख ७५ हजार रुपयांचे सोने तसेच पाच किलो वजनाचे चांदीचे दगड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करत आहे.

संबंधित

परभणीत सीसीटीव्हीच्या मदतीने पकडले चोरटे
पोलीस ठाण्याचा वापर करत चक्क पोलीस निरिक्षकांच्या नावाने लांबविला मोबाईल
इंदिरानगर परिसरात पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र ओरबाडले
अपघातग्रस्त ट्रकमधून दीड लाखांच्या कापडाची चोरी  
सहायक फौजदाराची कार फोडून पळविले पावती पुस्तक

नाशिक कडून आणखी

आरटीईच्या दुसऱ्या फेरीस प्रारंभ
महापालिकेच्या ३७ शाळांचे विलीनीकरण
दिंडोरीरोडवर चारचाकीची समोरासमोर धडक
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप
पूर्व प्रभाग सभापतिपदी  भाजपाच्या सुमन भालेराव

आणखी वाचा