नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 07:02 PM2018-03-08T19:02:50+5:302018-03-08T19:02:50+5:30

चौकशी पूर्ण : मुंढेंनी दिली चौकशीला चालना, संबंधितांना बजावल्या नोटीसा

 Four convicts in Nashik Municipal Corporation were convicted | नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध

नाशिक महापालिकेतील चौघा अधिका-यांवर दोषारोप सिद्ध

Next
ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोरगेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती

नाशिक - महापालिकेत विविध प्रकरणांतील गैरव्यवहारांवरून चौकशीच्या फे-यात अडकलेल्या चौघा अधिका-यांवरील दोषारोप सिद्ध झाले असून चौकशी पूर्ण होऊन संबंधितांना दहा दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात अंतिम नोटीसा बजावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या चौकशांची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे समजते. त्यामुळे, चौघा अधिका-यांवर गंडांतर येऊ घातले आहे.
महापालिकेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुमारे ११ अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध झालेल्या आरोपप्रकरणी चौकशी प्रलंबित होती. या अकरा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एकच निवृत्त अधिकारी नियुक्त केलेला होता. तुकाराम मुंढे यांनी दि. ८ फेबु्रवारीला आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनात साफसफाई मोहीम सुरू केली. काही अधिका-यांचे खातेपालट केले. त्यात, मुख्य लेखा परीक्षक महेश बच्छाव यांच्याकडे प्रशासनाचा अतिरिक्त कार्यभार सोपवितानाच दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या चौकशांचा महिनाभराच्या आत निपटरा करण्याचेही आदेश दिले. त्यानुसार, गेल्या १५ दिवसांपासून चौकशांच्या फाईलींवर अभ्यास सुरू होता. त्यात, निलंबित उद्यान अधिक्षक गो. बा. पाटील, निवृत्त अधिक्षक अभियंता (यांत्रिकी) आर. के. पवार, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन आणि मायको दवाखान्यातील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. उद्यान अधिक्षक गो. बा. पाटील यांच्या कारकीर्दीत कोटेशन घोटाळा गाजला होता. विनानिविदा दरपत्रक मागवून वृक्षारोपणासह कारंजे दुरूस्तीचे कामे करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्याविरूद्ध आहे. याशिवाय, चौकशी अधिकारी चौकशीसाठी गेले असता त्यांना सुमारे ४५० हून अधिक संचिका गायब झाल्याचे निदर्शनास आले होते शिवाय पाटील यांनी चौकशीतही सहकार्य केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. गेडाम यांच्या कारकीर्दीत पाटील यांच्याविरूद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. निवृत्त अधिक्षक अभियंता आर. के.पवार यांच्यावर खतप्रकल्पात अनावश्यक ६७ कोटी रुपयांच्या यंत्रखरेदीचा आरोप ठेवण्यात आला होता तर अग्निशमन दल प्रमुख अनिल महाजन यांच्याविरूद्ध ना हरकत दाखल्याविषयी शासनाचे परिपत्रक दडवून ठेवत वसुली केल्याचा आरोप आहे. निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी हे मायको दवाखान्यात कार्यरत असताना एका महिलेची रिक्षातच प्रसुती झालेली होती. त्यावेळी डॉ. कोकणी हे विनापरवानगी चार दिवस गैरहजर असल्याचे आढळून आले होते.

Web Title:  Four convicts in Nashik Municipal Corporation were convicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.