सुदैवाने अनर्थ टळला : ‘चोपडीसावर’खाली सापडली कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 04:46 PM2019-02-06T16:46:19+5:302019-02-06T16:51:04+5:30

नाशिक : गंगापूररोडवर दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानकपणे चोपडीसावर प्रजातीचा वृक्ष बुधवारी (दि.६) उन्मळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या बलिनो कारवर ...

Fortunately the disaster was over: the car found under 'Chopidiswar' | सुदैवाने अनर्थ टळला : ‘चोपडीसावर’खाली सापडली कार

सुदैवाने अनर्थ टळला : ‘चोपडीसावर’खाली सापडली कार

Next
ठळक मुद्दे मोटारीचे या घटनेत नुकसान चोपडीसावर हा वृक्ष शहरी भागात लावण्यायोग्य

नाशिक : गंगापूररोडवर दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानकपणे चोपडीसावर प्रजातीचा वृक्ष बुधवारी (दि.६) उन्मळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या बलिनो कारवर (एम.एच १५ एफएफ ९२४६) कोसळला. सुदैवाने यावेळी मोटारीत कोणीही नव्हते त्यामुळे जीवीतहानी टळली; मात्र मोटारीचे या घटनेत नुकसान झाले आहे
गंगापूररोड हा शहरातील एकमेव असा रस्ता आहे, की ज्याभोवती दुतर्फा वृक्षराजी पहावयास मिळते. मॅरेथॉन चौकापासून थेट जेहान सिग्नलपर्यंत रस्त्यालगत विविध प्रकारची झाडे आहेत. त्यामध्ये काही वर्षांपुर्वी महापालिकेने चोपडी सावरसारखे लावलेले वृक्षही आहेत. वृक्षलागवडीविषयी पालिकेचे असलेले अज्ञान यावरुन अधोरेखित होते. चोपडीसावर हा वृक्ष शहरी भागात लावण्यायोग्य नसून तो एखाद्या मोकळ्या भुखंडावर किंवा जंगलाच्या भागात असल्यास योग्य ठरतो; मात्रप्रशासनाने गंगापूररोडची ‘शोभा’ चोपडीसावर लागवडीने वाढविण्याचा प्रयत्न केला. योग्य ठिकाणी योग्य वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. महापालिका प्रशासनाने किमान आता तरी अशाप्रकारे विचार करुन योग्य ठिकाणी योग्य भारतीय प्रजातीची निवड करून अभ्यासपूर्ण पध्दतीने वृक्षलागवडीवर भर देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गंगापूररोडवर रस्त्यालगत वाहने पार्किंगसाठी अधिकृत मुभा पालिका-पोलीस प्रशासनाने दिली आहेत. त्यामुळे नाशिककर गंगापुररोडवर बिनदिक्कीतपणे महापालिकेने आखून दिलेल्या पांढऱ्या पट्टयांमध्ये आपल्या चारचाकी उभ्या करत आहेत; मात्र रस्त्यालगत चोपडी सावर, रेनट्रीसारख्या काही ठिसूळ प्रजातीची झाडे आहेत. बहुतांश झाडे वाळवी लागल्याने धोकादायक ठरू पाहत आहे. असेच एक झाड बुधवारी धवल चंदुलाल पटेल यांच्या मालकीच्या मोटारीवर कोसळल्याने मोटारीचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन वृक्षाच्या फांद्या कापून मोटारीवर पडलेला वृक्ष बाजूला केला.

Web Title: Fortunately the disaster was over: the car found under 'Chopidiswar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.