एसटीच्या चौकशी कक्षावर उडवाउडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:50 AM2018-11-26T00:50:39+5:302018-11-26T00:51:12+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्यामुळे चौकशी कक्ष असून, नसल्यासारखा झाला आहे. तसेच त्याच्या उपयोगिता शून्य ठरत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

 Fly in the ST room | एसटीच्या चौकशी कक्षावर उडवाउडवी

एसटीच्या चौकशी कक्षावर उडवाउडवी

googlenewsNext

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या चौकशी कक्षावर ‘प्रवासी हेच आमचे दैवत’ असे ब्रिदवाक्य प्रवाशांना जरी नजरेस पडत असले तरी ते ज्यांच्याकडे चौकशी करतात त्यांना मात्र या वाक्याचा विसर पडल्याचा अनुभव दररोज शेकडो प्रवाशांना येतो. त्यामुळे चौकशी कक्ष असून, नसल्यासारखा झाला आहे. तसेच त्याच्या उपयोगिता शून्य ठरत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
महामंडळाची बससेवा तोट्यात असल्याची ओरड केली जाते; मात्र ही बससेवा ज्यांच्या भरवश्यावर चालते त्याच प्रवाशांची दिशाभूल करीत त्यांनी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न चौकशी कक्षावरून होतो.
प्रवासाच्या प्रारंभीच प्रवाशांना ‘कटकट’ अनुभवयास येते. याबाबत रविवारी (दि.२५) एका प्रवाशाला या बसस्थानकावर असाच काहीसा अनुभव आला. शिरपूरला जाणाऱ्या बसगाड्यांची चौकशी दूरध्वनीवरून केली असता दुपारी २, ३ व ४ वाजता थेट गाडी उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र तीनच्या बससाठी प्रवासी गेला असता त्याला साडेतीन वाजता बस असल्याचे सांगण्यात आले.
तोपर्यंत बस फलाटावर आली नाही, म्हणून त्याने चौकशी केली असता थेट शिरपूरला जाणारी बस नसल्याचे सांगून धुळे बस पकडून तेथून
शिरपूर जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार प्रवासी फलाटावर उभ्या असलेल्या नाशिक-चोपडा शिवशाही बसमध्ये बसला असता शिरपूर बस निघत असल्याची उद्घोषणा करण्यात आली. तद्नंतर एम.एच २०.१३९० ही बस शिरपूरसाठी निघत होती. त्यामुळे सदर प्रवाशाची धावपळ उडाली.
उद्घोषणेमधील त्रुटी दूर व्हाव्यात
बसस्थानकावर फलाटांची संख्या कमी असल्यामुळे काही बसेस या फलाट सोडून उभ्या असतात. त्यामुळे चौकशी कक्षातून त्या बससेची दखल घेतली जात नाही व प्रवाशांच्या माहितीस्तव कुठलीही उद्घोषणा केली जात नाही. बस निघण्याच्या वेळी उद्घोषणा कानावर येते त्यामुळे जेष्ठ नागरिक, महिला यांची धावपळ उडते.
चौकशी कक्षातील ज्या कर्मचाºयाने प्रारंभी बस असल्याची माहिती दिली त्यानेच ती नंतर नसल्याचे सांगितले; मात्र पाच मिनिटांच्या अंतराने स्वत:च शिरपूर बसची उद्घोेषणाही केली. या अनागोंदी कारभारामुळे सदर चौकशी कक्षातील उद्घोषकांवर क ोणाचे नियंत्रण आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित व्हावा. कर्मचाºयाच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागल्याच्या तक्रारी आहेत.

Web Title:  Fly in the ST room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.