बाजारात दरवळला फुलांचा सुगंध ; पूजा, सावटीसाठी मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 06:37 PM2018-09-13T18:37:39+5:302018-09-13T18:40:04+5:30

गणेशोत्सवाला गुरुपासून (दि.१३) प्रारंभ झाला असून, गणेश स्थापनेच्या दिवशी गणरायांच्या पूजेसाठी व सजावटीसाठी सुगंधी फुलांना गणेशभक्तींनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहे.

Floral aroma in the market; Increased demand for pooja, decorative decoration | बाजारात दरवळला फुलांचा सुगंध ; पूजा, सावटीसाठी मागणीत वाढ

बाजारात दरवळला फुलांचा सुगंध ; पूजा, सावटीसाठी मागणीत वाढ

Next
ठळक मुद्दे गणेशोत्सवामुळे फुलांना मागणी वाढली बाजारपेठेत दरवळला फुलांचा सुगंध मागणीच्या तुलनेत अावक नसल्याने भाव वधारले

नाशिक : गणेशोत्सवाला गुरुपासून (दि.१३) प्रारंभ झाला असून, गणेश स्थापनेच्या दिवशी गणरायांच्या पूजेसाठी व सजावटीसाठी सुगंधी फुलांना गणेशभक्तींनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले.  नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असलने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. गौरी-गणपतीच्या काळात सजावटीला विशेष प्राधान्य दिले जात असल्याने गणेशचतुर्थीपासूनच सुगंधी फुलांची मागणी वाढते. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने गजबजून गेला होता. बाजारात कापडाची कुत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्या दिसून आले. गणेशपूजेसाठी शेवंती, अ‍ॅस्टर, गुलाबासह नियमित झेंडू, मोगरा, निशिगंधा या फुलांसह व्यावसायिकांनी ज्वास्वंदीची फुले आवर्जन उपलब्ध करून दिल्याचे दिसून आले. जास्वंद हे गणपत्ती बाप्पाचे आवडते फूल असल्याने या फुलला गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात मागणी अते. रंगीबेरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळाले. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Floral aroma in the market; Increased demand for pooja, decorative decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.