‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:20 AM2018-06-28T01:20:04+5:302018-06-28T01:21:20+5:30

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे.

'Flight' on the ground, the airline finally stopped! | ‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद!

‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद!

Next
ठळक मुद्देनाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे;

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे.
सामान्य नागरिकांनादेखील विमान प्रवास करता यावा तसेच देशभरातील सुमारे साडेपाचशे विमानतळांचा वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारने उडे देश का आम नागरिक ही घोषणा देत उडान योजनेची घोषणा केली होती. ओझर येथे शासनाने तयार केलेले विमानतळ तब्बल चार वर्षांपासून पडून असल्याने त्यावरून नागरी हवाई सेवा सुरू करावी, अशी नाशिकमधील उद्योजक आणि व्यावसायिकांची मागणी होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एअर डेक्कनने उडान योजनेंतर्गत नाशिक-मुंबई-नाशिक आणि नाशिक-पुणे-नाशिक अशी सेवा सुरू केली होती; मात्र सुरुवातीपासून ही सेवा विस्कळीत होती. २४ मार्चपासून नाशिक-पुणे ही सेवा बंद पडली. त्यानंतर नाशिक -मुंबईदेखील बंद पडली. मुंबईची सेवा पुन्हा सुरू झाली; परंतु पुणे सेवेसाठी वारंवार मुहूर्त दिले गेले. अलीकडेच २१ जून हा मुहूर्त कंपनीने दिला होता; परंतु ही सेवा अद्याप सुरू झाली नाही. उलट गेल्या शुक्रवारपासून (दि.२२) मुंबईची सेवादेखील बंद पडली आहे.
तांत्रिक कारणकंपनीच्या सूत्रांनी नेहमीप्रमाणे तांत्रिक कारणामुळे सेवा खंडित केल्याचे कारण पुढे केले आहे; परंतु अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. संकेतस्थळावर सर्रास तिकिटे सोल्ड आउट दाखविले जात आहेत.

Web Title: 'Flight' on the ground, the airline finally stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक