वेदमंत्रांच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथ मंदिराचे ध्वजावतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 02:24 PM2019-01-14T14:24:51+5:302019-01-14T14:25:02+5:30

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीर जीर्णोध्दाराच्या पाशर््वभुमीवर वेदमंत्रांचा जागर करीत विविध धार्मिक कार्यक्रमांसह व भक्तीपुर्ण वातावरणात श्री निवृत्तीनाथ मंदिराचा कलश व ध्वजावतरण सोहळा संपन्न करण्यात आला.

 Flag of Sri Nivruttinath temple in the hymns of Vedanta | वेदमंत्रांच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथ मंदिराचे ध्वजावतरण

वेदमंत्रांच्या जयघोषात श्री निवृत्तीनाथ मंदिराचे ध्वजावतरण

googlenewsNext

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीर जीर्णोध्दाराच्या पाशर््वभुमीवर वेदमंत्रांचा जागर करीत विविध धार्मिक कार्यक्रमांसह व भक्तीपुर्ण वातावरणात श्री निवृत्तीनाथ मंदिराचा कलश व ध्वजावतरण सोहळा संपन्न करण्यात आला. श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे जिर्णोध्दाराचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. २ कोटी ५७ लक्ष रुपयांचे अंदाज पत्रक असलेले मंदिराचे कार्य भाविक व वारकरी यांच्या आर्थिक सहकार्यातुन सुरू आहे. ५१ फुट काळ्या पाषाणातील हे नाथांचे मंदिर त्र्यंबकेश्वरच्या सौंदर्यात भर घालणार आहे. तर मंदिराच्या सभोवतालच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत आणखी २२ कोटी ३३ लक्ष रूपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे .यामध्ये सभा मंडप, वारकरी निवास, भक्त निवास, पुजारी निवास , ग्रंथालय, प्रासादालय आण िदर्शन बारी चे काम आराखड्यात दाखिवण्यात आलेले आहे . हा निधी मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विश्वस्त पुंडलीक थेटे यांनी दिली .

Web Title:  Flag of Sri Nivruttinath temple in the hymns of Vedanta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक